banner ads

शीर्षक नाही

kopargaonsamachar
0

 कोपरगांव शहरात घड्याळ दालनात चोरी – मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे यांनी घेतला घटनास्थळी आढावा

' पोलिस प्रशासनाला तातडीने कडक कारवाईच्या सूचना '

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुद्वारा रोडवरील प्रसिद्ध "सचिन वॉच" या घड्याळाच्या दालनात आज पहाटे चोरीची गंभीर घटना घडली. याची माहिती मिळताच मा.आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.भयभीत नागरिकांना आधार देत उपस्थित व्यापारी वर्गाशी चर्चा केली.
सचिन वॉच या दालनाचे मालक संजय लोहाडे आणि सनी लोहाडे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.घडल्या प्रकाराने नाराजी व्यक्त केली व त्यांनी यावेळी म्हटले की, शहराच्या मध्यवर्ती भागात असे प्रकार घडणे अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तपास जलदगतीने सुरु करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. या घटनेबद्दल एस.पी राकेश ओला यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी तपासासाठी पथक पाठवत असल्याची माहिती दिली. प्रतिक्रिया देताना सौ.कोल्हे यांनी सांगितले की, पोलिसांनी गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर स्थानिक पातळीवर पोलिसांचा धाक राहील, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत अशी भूमिका कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
शहराच्या मध्यवर्ती भागात असा प्रकार घडल्यामुळे या घटनेमुळे व्यापारी वर्गात संताप आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना रोखण्यासाठी कोपरगाव शहरात पोलिसांनी चोख गस्त ठेवावी आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष नजर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या वेळी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी घटनास्थळी उपस्थित होते. यामध्ये अतुल काले, महावीर काले, राजेंद्र झावरे, दिलीप अजमेरे, अनिल कासलीवाल, नारायण अग्रवाल, कलविंदर दडियाल, अशोक लोहाडे, संतोष गंगवाल, चेतन राणे, अमित लोहाडे यासह अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते.
संपूर्ण व्यापारी वर्गाने एकत्र येऊन प्रशासनाकडे ठोस कृतीची मागणी केली असून, कोपरगाव शहर गुन्हेगारीपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गुन्हेगारांवर जरब ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे अशी सौ.स्नेहलता कोल्हे यांच्याकडेही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!