banner ads

युवानेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

kopargaonsamachar
0

 युवानेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


 शिरसगांव सावळगावात शालेय वस्तुचे तर
शिर्डीत अनाथ बालकांना व वृद्धांना 
मिष्टान्न भोजन , माहेगाव देशमुख येथे दिव्यांगांना  पाण्याच्या जारचे वाटप
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशावर शोककळा पसरलेली असताना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक  कोल्हे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाला आदरपूर्वक प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यात श्री .कोल्हे यांचा वाढदिवस विविध संस्था ,युवक मंडळांनी सामाजिक उपक्रम  राबवित आपल्या युवा नेत्याचा वाढदिवस साजरा करत अनोख्या शुभेच्छा दिल्या.

       राज्य सहकारी साखर संघाचे संचालक युवा नेते विवेक  कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगावं तालुका औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांच्या मार्गदर्शनाखाली  शिरसगांव सावळगांव जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुला-मुलींना शालेयपयोगी वस्तु व गणवेशाचे वाटप केले तर
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी शिर्डी येथील साई आश्रया अनाथाश्रमात अनाथ बालकांना व वृद्धांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करून मानवतेचे उदाहरण घडविले.तर माहेगाव देशमुख येथे दिव्यांग बांधवांसाठी पाण्याच्या जार वाटपाचा उपक्रम प्रथम लोकनियुक्त मा.सरपंच बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे यांच्या पुढाकाराने करण्यात येऊन आपल्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
    वाढदिवसानिमित्त  आदिवासी मुला मुलींना शालेय वस्तु वाटप केल्या त्यात शिरसगांव सावळगांवसह पुर्व भागातील प्रत्येक सहकारी व्यक्तींची साथ लाभली आहे.  ग्रामिण भागातील मुला मुलींमध्ये गुणवत्ता आहे मात्र त्याला योग्य पध्दतीने आकार देवुन त्यांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर सन्मान कसा वाढेल यासाठीही युवानेते विवेक  कोल्हे सतत कार्यरत राहतात असे कोपरगावं तालुका औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी शुभेच्छा देताना सांगितले .

शिर्डी येथील साई आश्रया अनाथाश्रमात अनाथ बालकांना व वृद्धांना 
मिष्टान्न भोजनाचे प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, युवासेवक सर्वश्री विशाल गोर्डे, सिद्धार्थ साठे, रामदास गायकवाड ,दिनेश आदमाने, रोहित कणगरे, स्वप्निल मंजुळ, सतीश निकम, समाधान कुऱ्हे, प्रशांत संत, अजय शार्दुल, सागर राऊत आणि शुभम गिरे यांनी उपस्थित राहून प्रेमाने सेवा केली. अनाथ बालकांना व वृद्धांना प्रेमाने भोजन वाढले गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य या उपक्रमाच्या यशस्वीतेची साक्ष देत होते.
माहेगाव देशमुख येथे दिव्यांग बांधवांसाठी पाण्याच्या जार वाटपाचा उपक्रम  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान , बाळासाहेब पानगव्हाणे, माजी संचालक दत्तात्रय पानगव्हाणे, माजी व्हाईस सोपानराव पानगव्हाणे, वसंतराव पानगव्हाणे, एकनाथराव पानगव्हाणे, उत्तमराव पानगव्हाणे, अशोकराव पानगव्हाणे, पी. आर. काळे , संतोष जाधव, विजय कदम, मारुती कदम, नितीन कदम, विजयराव पानगव्हाणे, प्रवीण पानगव्हाणे, सतीश पानगव्हाणे, रवींद्र पानगव्हाणे, राहुल पानगव्हाणे, उमेशराव पानगव्हाणे, विकास पानगव्हाणे, विलास जाधव, शशिकांत पानगव्हाणे, नामदेव पानगव्हाणे, रमेश भगुरे, वारोबा रोकडे, दिलीप पानगव्हाणे, आदेश पानगव्हाणे, अक्षय पानगव्हाणे, रमेश पानगव्हाणे, आप्पासाहेब पानगव्हाणे, दादासाहेब पानगव्हाणे, भास्कर पानगव्हाणे, बाळासाहेब काळे, विलास काळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा हाच धर्म या भावनेने दिव्यांग बांधवांचे मोठे काम कोल्हे परिवार सातत्याने करत आहे. हजारो दिव्यांग बांधवांना आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार नेहमी सेवाव्रत असल्याने हा उपक्रम आदर्श शुभेच्छा ठरला आहे.
विवेक कोल्हे यांचे नेतृत्व आणि त्यांच्या मूल्यांवर आधारित कार्य पद्धतीमुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राबविलेल्या उपक्रमांना व्यापक सामाजिक मान्यता लाभली आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देत, विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने अधिक मोल प्राप्त झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!