banner ads

कोपरगावकरांना आता आठ दिवसाला पाणी

kopargaonsamachar
0

 कोपरगावकरांना आता आठ दिवसाला पाणी


कोपरगाव ( लक्ष्मण  वावरे )                                      नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने व येसगाव येथील नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक चार व पाच यांचा अंतर्गत मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच जलशुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर दुरुस्ती करावयाची असल्याने सध्याचा पाणीपुरवठा २७ तारखेपासून आठ दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे तसेच गाळून उकळून पिण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

याबाबत पालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळवले आहे की,कोपरगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (राज्यस्तर) अंतर्गत कोपरगाव पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून सदर योजनेचा कार्यादेश दिलेला आहे. सदर काम सद्यास्थितीत प्रगतीपथावर चालू आहे. येसगाव येथील नव्याने झालेला साठवण तलाव क्र.५ पूर्ण कार्यान्वित करणेत आला असून, उर्वरित तलाव ४ व ५ यांचा अंतर्गत मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच जलशुद्धीकरण केंद्र येथे दोन्ही फिल्टर दुरुस्ती करावायचे असल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरणेबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन १ मे रोजी सोडण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा हा दि २७ एप्रिल पासून शहरात ८ दिवसाआड करणेत येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी पाणी जपून वापरावे व नागरीकांनी आपल्या भागात असलेल्या विंधन विहीरीचा वापर करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा, पाणी गाळून व उकळून पिण्यासाठी वापर करावा. नगरपरीषद प्रशासन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहे.याची सर्वानी नोंद घ्यावी व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे व पाणी जपुन वापरावे अशी विनंती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!