banner ads

मंगल कलश रथयात्रा बुधवारी कोपरगाव-शिर्डीत

kopargaonsamachar
0

 मंगल कलश रथयात्रा बुधवारी कोपरगाव-शिर्डीत


आ.आशुतोष काळे करणार स्वागत

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही मंगल कलश रथ यात्रा बुधवार (दि.३० एप्रिल) रोजी कोपरगाव तालुक्यातून शिर्डीत दाखल होणार आहे. या मंगल कलश रथयात्रेचे शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी १०.०० वा.आ.आशुतोष काळे स्वागत करणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा, सामाजिक समरसतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी हि मंगल कलश रथ यात्रा राज्यभर उत्साहात सुरु आहे. या मंगल कलशमध्ये गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंची माती, नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात येणार असून कोपरगाव मतदार संघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पवित्र जल व विविध धार्मिक तीर्थक्षेत्राच्या पावन भूमीतील माती सजविलेल्या मंगल कलशातून मुंबई येथे नेण्यात येणार आहे.
धार्मिक उत्सवाबरोबरच भक्तीच्या संगमातून संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मंगल कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल कलश रथयात्रेच्या स्वागतास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चारुदत्त सिनगर यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!