संवत्सर येथे श्री वज्रेश्वरी मातेचा याञोत्सव संपन्न
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे श्री वज्रेश्वरी मातेची यात्रा सालाबादप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून भगवान मारुती गवारे,विष्णु मारुती गवारे, रामभाऊ मारुती गवारे यांनी ब्राम्हण वृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून विविध उपक्रमांनी व रामायणाचार्य.परशुराम महाराज अनर्थे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
प्रवचनप्रसंगी रामायणाचार्य परशुराम महाराज अनर्थे यांनी श्री वज्रेश्वरी मातेचा महीमा वर्णन करत सांगितले कि,भाविक भक्तांनी आपले दैनंदिन कर्तव्य, कर्म करीत असतांना भगवंताचे नामस्मरण करणे ही सुद्धा एक प्रकारे ईश्वर सेवा असल्याचा मोलाचा संदेश आपल्या प्रवचनातून त्यांनी दिला. यावेळी मोठया संख्येने भाविकांनी ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी संजीवनी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन .राजेंद्र परजणे ,भाजपा दिव्यांग सेल व माळी समाज जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक फकीरराव बोरनरे, संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे, तुषार बारहाते,परीमल कोद्रे, रत्नाकर काळे,अशोकराव मगर, दीनेश बोरनरे, राजेंद्र बोरनरे, व्यंकटेश बारहाते, पोपट बोरनरे, दिलीप कासार,संदीप मैंद,अविनाश बोरनरे, संदीप भाकरे, अतुल सांगळे, देविदास शिंदे, संभाजी शिंदे, राजेंद्र लुगांडे, अशोकराव कासार, कपिल ससाणे, संतोष ससाणे, सौ.लता रत्नाकर काळे, सौ.छाया मुकुंदमामा काळे, सौ.सुनिता नवनाथ पाचोरे व सौ.मोनाली कपिल ससाणे यांसह आदि भाविक भक्त , महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजक, नियोजकांचे मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच आयोजकांच्या वतीने आलेल्या भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.





