मोटार सायकल -- टेम्पोच्या अपघातात,एक ठार, एक जखमी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर पोहेगाव-शहापुर शिवारात मोटारसायकल व टेंम्पोचा अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला असुन एक जण गंभिर जखमी झाला आहे.ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
येवला तालुक्यातील अनकुटे येथिल लक्ष्मण मोतीराम तळेकर व अशोक भिकाजी तळेकर हे अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे यात्रेसाठी बजाज कंपनीची सी.टी १०० मोटारसायकलवर (क्रमांक एम.एच.१५ जी.सी.०४९३ ) चालले होते.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव- शहापुर शिवारात आल्यावर त्यांच्या मोटारसायकलला कोपरगावच्या दिशेने जाणा-या टेंम्पोने (क्रमांक एम.एच.१४ जे.एल.०७४४) जोराची धडक दिली.त्यात लक्ष्मण तळेकर हे जागेवरच ठार झाले तर अशोक तळेकर जखमी झाले.स्थानिकांनी त्यांना रुग्णवाहीकेने शिर्डी येथे रुग्णालयात पाठविले.अपघातानंतर टेंम्पो चालकाने त्या ठिकाणाहुन पळ काढला मात्र शहापुर व पोहेगावच्या युवकांनी त्यास पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले.शिर्डी पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




