क्रांती युवक संघटनेच्या वतीने महाबली हनुमान जन्मोत्सव व सहावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील जागृत देवस्थान असलेल्या महाबली हनुमान भक्त मंडळ व क्रांती युवक संघटनेच्या वतीने महाबली हनुमान जन्मोत्सव व सहावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र भद्रा मारुती येथून पाई ज्योत आणण्यात आली पहाटे महाबली हनुमान यांच्या मूर्तीचा विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला.त्याचप्रमाणे महाआरती संपन्न झाली सायंकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार अनिताताई जाधव यांच्या सु श्राव्य वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
त्या नंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण व आरती झाली व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले महाप्रसाद व कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच वकिली व्यवसायातील अनेक नामवंतांनी कार्यक्रम स्थळी येऊन महाबलीच्या चरणीलीन होऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती. अनेक भक्तांनी वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक स्वरूपात आपले योगदान या कार्यक्रमांसाठी दिले अशा सर्व भक्तांचे आयोजकांच्या वतीने जाहीर आभार मानून सत्कार करण्यात आला.







