banner ads

शाळेत भरले खेळण्यांचे अनोखे प्रदर्शन

kopargaonsamachar
0

 शाळेत भरले खेळण्यांचे अनोखे प्रदर्शन


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
आनंददायी शनिवार आणि पोषण पंधरवाडा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती ब्राम्हणगाव येथे खेळण्यांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले.
 मुलांना खेळायला खूप आवडते .पालक देखील जत्रेच्या निमित्ताने ,बाजारातून मुलांना वेगवेगळी खेळणे आणून देतात .त्यापैकी बरीचशी खेळणी मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत करतात .मुलं काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये ही खेळणी खूप फायदेशीर ठरतात. खेळणी मध्ये मुलांना व्यस्त ठेवण्याची कला असते. या खेळणी प्रदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्वतःकडे अगदी लहानपणापासून असलेली, जपून ठेवलेली खेळणी या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यामध्ये कापसापासून बनवलेल्या लहान मोठ्या बाहुल्या, ससा ,वाघ, मोर यासारखे प्राणी व पक्षी, भातुकलीची भांडी ,जेसीबी ,ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल यासारखे प्लास्टिक खेळणी ,तसेच माती पासून बनवलेली तुळस ,चूल, गाडगे ,मडके पारंपारिक खेळाची आठवण करून देणारा तारेपासून बनवलेला गाडा, लुडो, पझल्स, लाकडी बॅट ,बॉल यासारख्या विविध विकासात्मक  खेळण्या या प्रदर्शनात मांडल्या होत्या .या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकही डिजिटल खेळणी चा समावेश यामध्ये नव्हता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालक  तसेच बाळासाहेब बनकर ,माजी सरपंच शोभाताई बनकर, रंजनाताई बनकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब केकान, वैशाली मोरे उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे सहशिक्षक महेंद्र निकम मनीषा जाधव यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!