बनकर वस्ती शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती ब्राह्मणगाव येथे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे ,महेंद्र निकम ,मनिषा जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे तसेच संविधान प्रतिमेचे पूजन केले.
संविधान उद्देशिकाचे वाचन सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले.जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाबद्दल माहिती सांगितली.अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली. तसेच संविधान गीतावर सुंदर नृत्य सादरीकरण करण्यात आले. जिजाईचा शिवा आणि भिमाईचा भिमा हा पोवाडा सादर करण्यात आला. विविध गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. याप्रसंगी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच या कार्यक्रमासाठी बाळासाहेब बनकर ,माजी सरपंच शोभा बनकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब केकान, उपाध्यक्ष वैशाली मोरे, सुनिता भवर उपस्थित होत्या सरपंच अनुराग येवले उपसरपंच जगधने तसेच रंजना बनकर,शांताराम बनकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन महेंद्र निकम यांनी मानले.




