सांगवी भुसार येथे डंपर व दुचाकीचा भिषन अपघात
रवंदे येथिल दुचाकीस्वाराचा मृत्यू
मयत हर्षल धुळेकोपरगाव ( लक्ष्मण वावरे )रस्त्याच्या कामासाठी मुरुमाची वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटार सायकल स्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराच्या पायांचा चुरा झाला दुचाकी स्वार जबर जखमी झाल्याने दवाखान्यात उपचारासाठी वेळेत न पोहचता आल्याने तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. रविवार १३ एप्रिल रोजी दुपारी अकराच्या सुमारास सांगवी भुसार येथील रस्त्याच्या कामासाठी येवला येथून मुरमाची वाहतूक करणारा डंपर गावाच्या दिशेने जात असताना सांगवी भुसार येथे एका नातलगाच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी रवंदे येथून आलेला हर्षल तनाजी धुळे (वय २९) हा जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे दोन्ही वाहने एकमेकांना न दिसल्यामुळे अचानक मोटरसायकल व डंपरची समोरासमोर धडक होऊन हर्षल जबर जखमी झाला त्याच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचे दोन्ही पाय तुटले हर्षल वेदनांच्या आकांताने मोठमोठ्याने ओरडत होता घटनेची माहिती कळताच गावातून पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले पोलीस पाटील व गाडीचा चालक याने हर्षलला गाडी खालून बाहेर काढले व रस्त्यावर ठेवले वेळ दुपारची असल्याने डांबरी रस्ता पूर्ण तापलेला होता वरून उन्हाची तीव्रता खूप होती परंतु त्याला कोणीही सावली खाली नेण्याची तसदी घेतली नाही तब्बल दीड तास हर्षल भर उन्हात तापलेल्या रस्त्यावर पडलेला होता एकाने त्याच्या अंगावर पांढरे उपरणे टाकले त्यातच तो अर्धा मेला होऊन गेला हर्षलने पिण्यासाठी मला पाणी द्या असे मोठमोठ्याने ओरडून सांगत होता त्याचा आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या दोन महिला पिण्यासाठी पाणी घेऊन पळत आल्या परंतु तेथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पाणी पाजू दिले नाही. हर्षलने स्वतः नातेवाईकांचे फोन नंबर दिले व मला वाचवा मला ॲम्बुलन्स बोलवा असे ओरडून सांगत होता शेवटी एकाने १०८ नंबर डायल करून कोपरगावहून रुग्णवाहिका बोलावली ती रुग्णवाहिका तब्बल दीड तासाने हजर झाली.त्यात त्या चालकाने नाशिकला जाण्यास असमर्थता दर्शवली मग रवंदेचे ऋषिकेश कदम यांनी संजीवनीची रुग्णवाहिका बोलाविली पुन्हा पेशंट उतरून या गाडीत टाकून नाशिकला हलविले रक्तस्राव प्रचंड झाल्याने शरीरात रक्तच न राहिल्याने दवाखान्यात नेत असताना हर्षल चा मृत्यू झाला.कोपरगाव पोलिसांनी संध्याकाळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.




