गवंडगाव येथील श्रीराम कथेची कीर्तनाने सांगता
सुरेगाव रस्ता ता.येवला ( सुनिल गायकवाड )
श्रीराम कथा समाप्ती निमित्त संत सदगुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम गवंडगाव येथे हरिभक्त परायण गोपालानंदगिरी महाराज यांचे मार्गदर्शनाने गायनाचार्य ह भ प भरत महाराज चव्हाण म्हणाले राजूभाऊ चव्हाण यांचे जाहीर हरिकीर्तन झाले मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते येनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही या अभंगावर संत विषयावर संत परंपरेवर सुंदर कार्यक्रम झाला योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज गोदाधाम सरला बेट महंत हिंदू हृदय सम्राट स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या विचाराची उजळणी झाली.
आणि भाविकांच्या उपस्थितीत राम जन्म साजरा झाला सदर प्रसंगी गवंडगाव येथील शेकडो भाविक यांनी ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सुंदर नियोजन शिवसुर्य तरुण मित्र मंडळ गवंडगाव यांनी केले होते किर्तन संपल्यानंतर महाप्रसादच सुंदर असं नियोजन केलं शिवसुर्य मिञ मंडळाने केले होते
कार्यक्रमासाठी सुरेगाव रस्ता,पांजरवाडी,अंदरसुल,बोकटे, देवळाने,खामगाव,भुलेगाव,देवठान, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते





