banner ads

श्रीरामनवमी निमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान कडून भाविकांना ताकवाटप

kopargaonsamachar
0

 श्रीरामनवमी निमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान कडून  भाविकांना ताकवाटप



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
प्रभू श्रीराम नवमीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने नगर मनमाड महामार्गावरील तीनचारी समृद्धी पूल येथे जवळपास तीस हजार भाविकांना ताक वाटप करण्यात आले.प्रसंगी मोठ्या संख्येने विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईगाव पालखी आणि मुंबादेवी तरूण मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजन केल्या जाणाऱ्या कोपरगावच्या मानाच्या पालखीचे पूजन करून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.


                      जाहिरात 
दरवर्षी रामनवमीला श्री क्षेत्र शिर्डी येथे जाणाऱ्या कोपरगाव शहरातील गाव पालखीतून हजारो भाविक शिर्डीला जातात.राज्याच्या विविध भागातून देखील मोठ्या संख्येने भाविक या पालख्या घेऊन येतात.या भाविकांच्या सेवेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठाने नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेत असते.गतवर्षी श्री साईबाबांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारा देखावा साकारण्यात होता त्या प्रमाणे यावर्षी देखील प्रभू श्रीराम यांचे भव्य कटआउट उभारले होते तिथे सेल्फीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खबरदारी घेण्यात आली होती.माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या नावाने सुरू असलेल्या फिरता दवाखान्याच्या माध्यमांतून लहान मुले,वयोवृद्ध नागरिक, दूर अंतरावरून पायी येणाऱ्या भाविकांना मोफत उपचार सुविधा देण्यात आली.वेळप्रसंगी अती तातडीसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आलीं होती.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात तीस हजारहून अधिक भाविकांना ताक वाटप करून संजीवनी युवाप्रतिष्ठानच्या युवासेवकांनी भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कोपरगावच्या हजारो भाविकांना शिर्डी येथे दर्शन झाल्यानंतर परतण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मोफत वाहन व्यवस्था करत बस उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. तीस पेक्षा अधिक बसच्या माध्यमांतून हजारो भाविकांना रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहरात पोहचविण्याचे काम बस सेवेच्या माध्यमांतून केलें गेले.

ताक वाटप झाल्यानंतर सदर परिसराची युवासेवकांनी स्वच्छता करून रस्त्यावर पाण्याचे ग्लास,रिकामे पाउच यांचा निर्माण झालेला कचरा साफ करून सामजिक उपक्रम राबविताना स्वच्छतेचे महत्व देखील नेहमीप्रमाणे प्रतिष्ठानने जपले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!