प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रभाकर धनगे
सुरेगाव रस्ता ता येवला ( सुनिल गायकवाड )
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या
येवला तालुका अध्यक्षपदी अंदरसूल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर धनगे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात
धनगे यांनी दिव्यांग बांधव व सामाजिक स्तरावर केलेल्या कार्याची संघटनेने दखल घेत त्यांची येवला तालुका दिव्यांग क्रांती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.





