banner ads

भारतीय राज्यघटनेने देशाची खरी प्रगती -- अॕड. शिरिष लोहकणे

kopargaonsamachar
0

 भारतीय राज्यघटनेने देशाची खरी प्रगती -- अॕड. शिरिष लोहकणे     


    कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
  तालुक्यातील संवत्सर येथील  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयाच्या वतीने नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व संयुक्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटात माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव मैंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

यावेळी  प्रमुख पाहुणे उपसरपंच विवेक परजणे ,दिलीप ढेपले खंडेराव फेपाळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब बाराहाते, माजी संचालक शिवाजीराव बारहाते वसाहतीचे संचालक सोमनाथ पाटील निरगुडे ,माजी संचालक फकीरराव बोरनारे  माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड मराठा महासंघाचे मधुकर साबळे मराठा महासंघाचे कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, संवत्सर पोलीस पाटील लिनाताई आचारी माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, हबीब भाई तांबोळी ,भाऊसाहेब कासार ,सचिन काळे प्रा. वाय.आर. खांडेकर गणेश वाघिले ,पठाण आदिच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जनता इंग्लिश स्कूल संवाद सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन प्रबोधनात्मक पुस्तके व मिठाई  वाटप वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारुड सर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधुकर साबळे बाळासाहेब देवकर ,शिवाजीराव बारहाते एकनाथ मैंद,सुनील वाघमारे ,वाय. आर. खांडेकर संपतराव भारुड , कुंदाताई भारुड शितल कांबळे आदींनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या भाषणात पुढे अॕड लोहकने म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेत सर्व जातींना समाविष्ट केल्याने मानव जातीवर असंख्य उपकार झालेले आहेत. त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही.महापुरुषाच्या  जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने त्यांचे कार्याचे ,विचाराचे स्मरण करावे, त्यांच्या राज्यघटनेने देशाची खरी प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी अशोक भारुड ,मधुकर मैंद दिलीप मैद ,विजय काकडे सुनील मोहिते, दिलीप पेंढारे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्त्रिया पुरुष हजर होते. यावेळी सूत्र संचालन  गणेश कांबळे  व सुनील वाघमारे  यांनी केले तर प्रास्ताविक  व आभार वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारुड  यांनी मानले मोठ्या संख्येने स्त्रिया पुरुष विद्यार्थी हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!