banner ads

एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन

kopargaonsamachar
0

 एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये भारतरत्न, क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव  सरोदे  यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

 या प्रसंगी रयतसेवकांना संबोधित करताना प्रा.किरण पवार यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दैदिप्यमान कर्तृत्व, त्यांनी केलेले वाचन, त्यातून केलेले सत्यान्वेषण याबद्दल माहिती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा दिला. तसेच, डॉ.आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक आणि अतिशय परिश्रमाने बनविलेल्या भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वांनी ध्यानी घ्यावे, असे आवाहन केले.
 महाविद्यालयाच्या  एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजनेच्या  वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाविद्यालय ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा  पर्यंत  पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर ठिकाणी मानवाच्यापुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  संविधान संहितेचे वाचन करण्यात आले.  या पदयात्रेत रयत शिक्षण संस्थेचे  जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॕड. संदीप वर्पे यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. 
सदर कार्यक्रमप्रसंगी सर्व विभागांचे उपप्राचार्य सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,कार्यालयीन अधीक्षक  . सुनील गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!