निमा दिवस व निमा चा ७८ व्या वर्धापन दिन कोपरगावात साजरा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात १३ एप्रिल २०२५ रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा स्थापना दिवस (निमा दिवस) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोपरगाव शहरातील आयुर्वेद पदवीधर डॉक्टरांच्या निमा संघटने तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व डॉक्टरांनी वाकेथॉन ( walkathon ) करत कोपरगाव शहरातून प्रभात फेरी काढली. कोपरगाव शहरातील आयुर्वेद पदवीधर डॉक्टर्स, आर जे एस आयुर्वेद कॉलेज व संजीवनी आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. वाकेथॉनच्या माध्यमातून आरोग्यदृष्ट्या चालण्याचे महत्व जनसामान्यांना प्रतिपादित केले. आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
सकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे निमा अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर आव्हाड, डॉ. वैशाली आव्हाड यांच्या हस्ते नारळ वाहून या प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली. आरोग्य विषयक जनजागृती आणि एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी विद्यार्थी व डॉक्टर्स यांनी हातामध्ये आरोग्यविषयक बॅनर्स घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढत जनजागृती केली.
सदर रॅली नंतर कोपरगाव बस स्टॅन्ड समोरील डॉ. भाकरे हॉस्पिटल पर्यंत काढण्यात आली होती.
डॉक्टर राठी हॉस्पिटल च्या सभागृहात उर्वरित कार्यक्रम संपन्न झाला. कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी, डी.बी काळे एलआयसी कोपरगाव ,तसेच डॉ. वैशाली आव्हाड साथरोगतज्ञ महाराष्ट्र राज्य, डॉ. गर्जे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास धनश्री महिला पतसंस्थाच्या अध्यक्षा सौ शीलाताई कुदळे, डॉ. प्रतिक्षाताई सूर्यवंशी मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी निमा अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर आव्हाड, सेक्रेटरी डॉ. विरेश भाकरे , खजिनदार डॉ. मनोज बत्रा, उपाध्यक्ष डॉ. सतिश लोढा, डॉ. कोळपे दत्तात्रेय, तसेच डॉ विवेक सूर्यवंशी , डॉ. नितीन झंवर, डॉ विलास आचारी, डॉ रमेश सोनवणे, डॉ अरुण भांडगे, डॉ गोपाळकृष्ण जगदाळे, डॉ वैभव गवळी, डॉ जितेंद्र रणदिवे, डॉ वैभव देवकर, डॉ.दिलीप दवंगे, डॉ गणेश देवकर, डॉ घनश्याम गोडगे ,डॉ सोपान जुंधारे, डॉ बाळासाहेब जुंधारे, डॉ संदीप चव्हाण, डॉ राजेंद्र वाघडकर, डॉ आचारी मॅडम , डॉ दिपाली आचारी, डॉ स्नेहल भाकरे, डॉ रोहिणी पाटील डॉ राजाराम पाटील उपस्थित होते. तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कौस्तुभ भोईर व डॉ. अभिजीत आचार्य यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार डॉ. विरेश भाकरे यांनी मानले.






