वारीत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संगीतमय भागवत कथेची उत्साहात सांगता
कोपरगाव (लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील वारी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने येथील खोलवाट मित्र मंडळ वारी आणि वारी ग्रामस्थ यांच्या वतीने सात दिवसीय संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प सौ सुरेखाताई टेकेमहाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून हजारो भाविकांनी संगीतमय कथा श्रवनाचा लाभ घेतला त्यांना गायनाचार्य ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे,ह भ प विनायक महाराज टेके,ह भ प आस्तिक महाराज टेके , मृदुंगाचार्य ह भ प शंकरमहाराज गोंडे ,अँक्टोपॅड साथ यश भड यांनी मोलाची साथ दिली या कार्यक्रमात नाचत फुगड्या खेळत उपस्थित भाविकांनी व उपस्थित महिलांनी कथेचा आनंद घेतला
श्रीमद भागवत कथा आयोजनाचे हे दुसरे वर्ष असुन अत्यंत उत्तम नियोजन झाल्याने खोलवाट मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे
कथा सांगता निमित्ताने समाज प्रबोधनकार प्रसिद्ध रामयनाचार्य ह भ प परशुराम महाराज अनर्थे यांचे सुश्राव्य वाणीतून त्यांच्या विनोदी शैलीत काल्याचे मंत्रमुग्ध करणारे किर्तन झाले
वारी पंचक्रोशीतील भाविक व महिलांनी मोठया संख्येने कथा श्रवणाकरिता सातही दिवस गर्दी केली होती भागवत कथेमध्ये वृंदावन येथुन आलेले रिंकूभैया उर्फ राकेश शर्मा यांनी शिव तांडव, मयुर नृत्य, सुदामा श्रीकृष्ण ही पात्रे स्वतः व गावातील उत्साही तरूण तरुणींना बरोबर घेऊन हुबेहूब साकारली दररोज होणारी सामुदायिक सवाद्य आरती आणि महाप्रसाद पंगत असा कार्यक्रम नित्य नेमाने सुरु होता त्यामुळे वारीत वातावरण भक्तिमय झाले होते
या कार्यक्रमाला गोदावरी बायोरिफायणरीजचे डायरेक्टर सुहास गोडगे, सरपंच बद्रीनाथ जाधव,माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके अशोकराव कानडे ,नामदेवराव जाधव,ग्रा प सदस्य विशाल गोर्डे, पत्रकार रोहीत टेके, बापु घुमरे,फकीर टेके आदींनी तसेच कान्हेगाव, धोत्रे, भोजडे,सडे, शिंगवे, बाबतरा, घोयेगाव,राहता येथील भाविकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या
वारी पंचक्रोशीतील सर्व साई भक्त, तरुण मंडळे, सर्व भजनी मंडळ,जय बाबाजी भक्त परिवार स्वामी समर्थ भक्त परिवार,जगदंबा आरती मंडळ, ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवान मंडळ , स्वाध्याय परिवार अशा सर्व धार्मिक मंडळाच्या व गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगत खोलवाट तरुण मंडळाने सर्वांचे आभार मानले




