banner ads

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी सुरेश बोळीज यांची निवड

kopargaonsamachar
0

 रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी सुरेश  बोळीज यांची निवड 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्था,सातारा यांचे मॅनेजिंग कौन्सिलच्या  झालेल्या बैठकीमध्ये कोपरगाव तालुक्यातील सुरेश विठ्ठलराव बोळीज यांची सेवानिवृत्त आजीव सभासादांमधून जनरल बॉडी सदस्यपदी निवड करणेत आली.

कर्मवीर अण्णांनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा शाळा, हायस्कूल, महाविद्यालय इत्यादी माध्यमातून प्रचंड मोठा शाखाविस्तार आहे. सुरेश बोळीज यांच्या शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा आणि योगदानाचा हा संस्थेने केलेला सन्मान आहे.
त्यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता ॲड.संदीप वर्पे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे तसेच कोपरगाव तालुक्यातील आजी माजी रयत सेवकांनी,रयत सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी,विशेषतः विविध सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले  व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!