banner ads

चौदा वर्षांनंतर कोपरगांवात कृभुको खत रॅक पॉईंट सुरु

kopargaonsamachar
0

 चौदा वर्षांनंतर कोपरगांवात कृभुको खत रॅक पॉईंट सुरु 


शेतकऱ्यांची खतांची अडचण दुर होणार

 बिपीनदादा कोल्हे यांचे केंद्र तसेच नविदिल्ली स्तरावर विशेष  प्रयत्न

 
कोपरगांव-( लक्ष्मण वावरे )

            शेतक-यांना शेतीसाठी तात्काळ खतमात्रा उपलब्ध व्हावी याहेतुने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले आहे यामुळे कृषक भारती को. ऑप लि. नविदिल्ली (कृभको) चा खत रॅकपॉईंट कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे चौदा वर्षानंतर सुरू झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष  अंबादास देवकर यांनी दिली.
            तालुक्यातील शिंगणापुर येथील कोपरगांव रेल्वेस्थानक मालधक्क्यावर कृभको खताचा रॅकपॉईंट शुभारंभ  होवुन खत वॅगनचे विधीवत पुजन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, संचालक विश्वासराव महाले यांनी प्रास्तविक केले.

            ते पुढे म्हणाले की, शेतक-यांना कृभको युरिया खताचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच कृभको १० : २६: २६ डी.ए.पी, ट्रिपल सुपर फॉस्पेट इत्यादी खते वेळेत उपलब्ध व्हावी, वाहतुक खर्चात बचत व्हावी या उददेशांने कोपरगांव रेल्वेस्थानक येथे खत रॅक पॉईंट सुरू होण्यासाठी बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार सौ स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी केंद्र तसेच नविदिल्ली स्तरावर जाणिवपुर्वक प्रयत्न केले. पुर्वी २०११ पर्यंत कोपरगांव रेल्वे मालधक्क्यावर कृभको खते मिळत होती पण त्यानंतर हा खत रॅक पॉईंट बंद झाल्याने शेतक-यांना शेतीसाठी खतांचा तुटवडा जाणवत होता., आता चौदा वर्षांनंतर खत रॅक पॉईंट सुरू झाल्याने ही अडचण दुर झाली, त्याचबरोबर शेतीविषयक इतर कृषी विषयक  उत्पादनेही शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होणार असल्याचे अंबादास देवकर शेवटी म्हणाले.

याप्रसंगी प्रगतशिल शेतकरी सचिन दत्तात्रय कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्रंबकराव सरोदे, बापूसाहेब बारहाते, निवृत्ती बनकर, आप्पासाहेब दवंगे, संजय औताडे, संभाजीराव गावंड, नानासाहेब थोरात, डी. पी. मोरे, प्रकाश सांगळे, रामदास शिंदे, प्रभाकर बढे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, संजय तुळस्कर, कैलास संवत्सरकर, आदि विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय उर्फ बाळासाहेब रूपनर यांनी केले. संभाजीराव गावंड यांनी आभार मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!