शिंगणापुर शिवारात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार:दोन जखमी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथील अक्षय उत्तम फटांगरे या शेतकऱ्याकडील मेंढ्यांच्या कळपावर मंगळवार (दि.११ ) रात्री बिबट्याने जोरदार हल्ला केला या हल्ल्यात मेंढ्या वाघुर तोडून पळाल्या माञ तिथे बांधलेल्या शेंळ्यांपैकी तीन शेळ्या ठार झाल्या असून दोन जखमी झाल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अगोदरही या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने अनेक कुञी गायब झाली आहे.
शिंगणापुर येथिल रहिवासी अक्षय उत्तम फटांगरे यांच्या मालकीच्या मेंढ्या व शेळ्या असुन त्यांनी त्या आपल्या राहत्या घराजवळ शेतात वाघुर लावून मेढ्या व शेळ्या च-हाटाने दावणीला बांधल्या त्यांना राखण म्हणून त्यांचे वडील उत्तम रखमाजी फटांगरे तेथे झोपलेले होते राञी २ वाजे दरम्यान दोन बिबट्यांनी या कळपावर हल्ला केला बिबट्यांची चाहुल लागताच मैंढ्या ओरडत सैरभेरी होत वाघुर तोडून पळाल्या माञ दावणीला बांधलेल्या शेळ्यापैकी तीन शेळ्या बिबट्यांनी फस्त करत दोन शेळ्या जखमी अवस्थेत पडल्या मेंढपाळाचा आरडा ओरड व मेंढ्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिक येताच बिबट्यांनी धुम ठोकली या परिसरासह खिर्डी गणेश,येसगाव,बोलकी शिवारातही बिबट्यांचा पिलांसह मुक्त संचार असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांची पाळीव कुत्री व जनावरे फस्त केली आहेत.







