तलाठ्यावरील खोटा गुन्हा रद्द करा
तलाठी व महसूल कर्मचारी संघटनांचे बेमुदत काम बंद आंदोलन
निवेदनात म्हटले आहे की नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर गुन्हा हा सदोष दाखल केला असुन संबंधित तलाठी यांनी फिर्यादी शी लाच घेण्यासाठी कोणताही संपर्क केला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.मात्र त्यास जाणीवपूर्वक गुंतवले आहे.सदर घटनेतील फिर्यादी हा मोठा वाळूचोर असून तो वारंवार अशा घटना घडवून आणत आहे.वाळूचोरीस सहकार्य केले नाही की खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. आम्ही दोषी असेल तर जरूर कारवाई करा मात्र दोष नसताना अडकवणे ही बाब गंभीर असल्याचा संघटनेचा आरोप आहे.यातील आरोपी हा रक्कम घेंण्याची सूचना केली जात असताना तलाठी पऱ्हाड यांनी त्यास नकार दिला असताना कारवाई व्हावी ही गंभीर बाब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.उद्याही बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहीती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे या आंदोलनाने संपूर्ण तालुक्यातील महसुलचे कामकाज ठप्प झाले आहे
दरम्यान संबंधित तलाठी ज्या धारणगाव सजेत कामकाज करत होते तेथिल प्रतिष्ठित नागरिकांचे म्हणने आहे की श्री प-हाड यांनी या सजेत काम करीत असताना वेळोवेळी वरीष्ठांच्या आदेशाने वाळू तस्करांवर कारवाई करुन त्यांचे अनेक वेळेस वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे साहित्य जाळून मोठी कारवाई केलेली आहे हे तालुक्यातील जनतेला माहित आहे त्याचा बदला अशा पध्दतीने घेतला जात असेल तर चांगले अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करतील असे सांगितले .
तर तलाठी संघटनेच्या वतीने सदर प्रकरणी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले आहे.त्यावर श्रीमती ए.एस.निर्मळ,श्रीमती व्हीं.व्हि.कोल्हे,पी.एन.वाडे
'.






