banner ads

कर्तुत्वान महिलांच्या सहभागाने विकृत चित्र बदलेल.-- नितीन औताडे

kopargaonsamachar
0

 कर्तुत्वान महिलांच्या सहभागाने   विकृत चित्र बदलेल.--  नितीन औताडे



शिवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
देशामध्ये सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र राजकारणात ते चित्र दिसत नाही.
समाजकारण राजकारणातही कर्तुत्वान महिलांचा सहभाग वाढला तर निर्णय प्रक्रियेत महिला हिताचे अधिक निर्णय होतील. आता असलेले काहीसे विकृत चित्रही अधिक बदलेल. महिलांनी एकनाथ शिंदे यांच्या  नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षात सक्रिय सहभागी व्हावे.  त्यांच्या कर्तुत्वाला निश्चितच  येथे वाव मिळेल. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी केले.
कोपरगाव शहरातही नाविन्यपूर्ण वाटा निवडून प्रतिकूल परिस्थितीत धाडसी निर्णय घेणाऱ्या अनेक रणरागिणी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.  असे महिलां प्रति गौरवोद्गार शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल  पुंडे यांनी काढले.
 शिवसेनेच्या वतीने महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वसामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आयोजित करण्यात आला. 
 बेकरी, खानावळ, बेबी नर्सिंग, गृह उद्योग, रसवंती, कृषी सेवा, मेडिकल, ब्युटी पार्लर,  रुग्णसेवा,  धार्मिक- सामाजिक- अध्यात्मिक क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला . याप्रसंगी ते बोलत होते. 
प्रतिभा वाणी, सुमित्रा कुलकर्णी, कमल नरोडे, शारदा सुरळे, उमाताई वाहाडणे, स्वाती मुळे,  कल्पना मोरे,  रूपाली महाडिक,  स्मिता कुलकर्णी,  उर्मिला लोळगे , सुवर्णा दर्पेल,  कविता दरपेल, दीपा भुतडा,  साक्षी भगत,  निर्मला भगत, विद्या गोखले,  सुवर्णा जंगम,  जया जंगम,  रंजना भोईर,  पुष्पा जगताप,  उषा शिंदे,  रत्ना पवार,  मंदा कोते,  आदी अनेक महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय मदत कक्षाचे ज्ञानेश्वर कपिले यांनी केले, तर सुनील साळुंके यांनी आभार मानले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनिल नरोडे,जिल्हा समनव्यक शिवाजी जाधव,युवसेना उपजिल्हाप्रमुख किरण गवळी,युवासेना तालुकाप्रमुख अभिषेक आव्हाड,युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड,शेतकरी सेनेचे बाबासाहेब बढे,विनोद गलांडे महिला आघाडी तालुकाप्रमुख मीनाक्षी वाकचौरे,कोकमठाण शिवसेना सरपंच दुशिंग , महिला आघाडी शहर प्रमुख विद्या धोंड,शयरा सय्यद,हेमा तवरेज,आरती गाडे,शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शेतकरी सेना, वैद्यकीय कक्ष 
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!