उक्कडगाव रेणुकामाता मंदिर कळसासाठी, व जिर्णोद्धारासाठी भाविकांची मदत
चैत्र पौर्णिमेपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस
कोपरगाव (लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर ट्रस्ट कळसासाठी व जिर्णोद्धारासाठी शिरसगाव कांदा मार्केट चे अध्यक्ष रेवणनाथ श्रीरंग निकम यांनी एक लाख रुपयांच्या विटा, राहुल संजय नाईकवाडे ५१ गोणी सिमेंट, भास्कर नरहरी निकम ५१ गोणी सिमेंट, आसाराम दादा पाटील निकम २५ गोणी सिमेंट, राजेंद्र रामभाऊ दुशिंग खोपडी ५० गोणी सिमेंट, या भाविकांनी यथाशक्ती मदत केली आहे. येत्या चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती पर्यंत रेणुका माता मंदिराचे कळसाचे काम पूर्णत्वाकडे नेण्याचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष अशोक शिंदे व विश्वस्तांनी दिली.
उक्कडगाव रेणुका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे, विश्वस्त बाबासाहेब शिंदे, लुखाजी शिंदे, सोपान शिंदे, बाळासाहेब शिंदे, व विश्वस्तांनी या मंदिर जीर्णोद्धार कामासाठी लक्ष केंद्रित केले आहे. या आधी संभाजीनगरचे भाविक आहेर यांच्याकडून झुंबर, तर दिनेश यादव नाशिक ६ लाख रुपयांचे मार्बल सिंहासन, हरुण मिस्तरी यांच्या देखरेखीखाली मंदिर जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे नंदू शिंदे म्हणाले.
. सध्या त्रंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर जिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे, सरला बेट येथील ब्रह्मलीन महंत नारायणगिरी महाराज यांनी येथील पशु बळीची प्रथा बंद केली होती. गोदाधामचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते १४ वर्षापूर्वी या मंदिर निर्माण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मंदिराचे काम पूर्ण होत आले असून आता भाविकांनी मंदिरासाठी कलर लाईट फिटिंग साठी विविध सामान दान स्वरूपात देण्याचे आवाहन अध्यक्ष शिंदे यांनी केले आहे.