banner ads

गाण्याच्या माध्यमातून खोटी व बनावट टिका करणाऱ्या कुणाल कामरा वर गुन्हा दाखल करा.

kopargaonsamachar
0

 गाण्याच्या माध्यमातून खोटी व बनावट टिका करणाऱ्या कुणाल कामरा वर गुन्हा दाखल करा.

कोपरगाव तालुका युवा सेनेच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गतिमान विकास केला. महा विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता प्रथम स्थापन करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली. जनतेतील मुख्यमंत्री म्हणून व सध्या उपमुख्यमंत्री म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाल कामरा नामक कॉमेडियन याने गाण्याच्या माध्यमातून खोटी व बनावट टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्याने केलेले कृत्य नालायकपणाचे असून शिवसेना पक्षाच्या वतीने त्याचा निषेध केला जात आहे. या कामरावर तातडीने गुन्हा दाखल व्हावा यासाठी कोपरगाव तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

युवा सेना तालुकाप्रमुख अभिषेक आव्हाड ,अक्षय जाधव, शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, सुनील साळुंके,मनिल नरोडे आदींच्या स्वाक्षऱ्या अर्जावर आहेत. 
 निवेदनात त्यांनी म्हटले की शिवसेना पक्षाचे वतीने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे काम केले जाते. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे  आमचे दैवत आहे. त्यांच्यावर कुणाल कामरा या विशिप्त स्टँन्डप कॉमेडीमने गाण्याच्या माध्यमातून खोटी व बोगस टीका केली आहे. सदर गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याने ती सोशल मीडिया व प्रसारमाध्यमाद्वारे पसरवली आहे.

 एकनाध शिंदे "  शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आहेतच मात्र सध्या ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहे. संविधानिक दृष्ट्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीवर स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खोटी व बोगस टीका करणे व त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे हे कायद्याला मान्य नाही. त्यामुळे या समाजकंटकाच्या कृतीने समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक , पदाधिकारीव सामान्य जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. तेव्हा एकनाथ शिंदे  यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक, शिर्डी पोलीस स्टेशनचे उपाध्यक्ष यांना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!