banner ads

सहकाऱ्यांची निवड उत्तम असेल तर यशाची जबाबदारी निश्चित पार पडते -- प्राचार्य प्रदिप कदम

kopargaonsamachar
0

 सहकाऱ्यांची निवड उत्तम असेल तर यशाची जबाबदारी निश्चित पार पडते -- प्राचार्य प्रदिप कदम


मा.मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमीत्त कोल्हे कारखाना कार्यस्थळावर प्रेरणादिन साजरा

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

        
मा.मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी
ज्या ज्या कामांना स्पर्श केला ते सोन्यासारखे झाले त्यांनी संघर्षांतुन संजीवनीचं साम्राज्य उभं केलं,
  जी माणसं गोड असतात ती दुस-याला ओढ लावतात, सहकाऱ्यांची निवड उत्तम असेल तर यशाची जबाबदारी निश्चित पार पडते तद्ववत स्व.  कोल्हे यांनी कष्टकरी, उस उत्पादक सभासद, शेतक-यांच्या मदतींने सहजानंदनगरच्या खडकाळ माळरानांवर हिरवळ पिकवली, सहकाराच्या माध्यमांतुन अनेक संस्था निर्माण केल्या, कष्टाने संघर्षाचा इतिहास बदलवत अनेकांचे आयुष्य सुंदर केले आहे त्याचं आयुष्यच आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्ट (देहु) चे विश्वस्थ, प्राचार्य  प्रदिप कदम यांनी केले.
          
  संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष  विवेक  कोल्हे यांच्या विचारातुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९६ व्या जयंतीनिमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाबरोबरच तालुक्यात तसेच अहिल्यानगर जिल्हयात व राज्यात प्रेरणादिनाचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य प्रदिप कदम बोलत होते.

           प्रारंभी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. मॅनेजिंग डायरेक्टर  बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे कार्य कर्तृत्व अनेकांना प्रेरणा आहे. जिदद, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि चिकाटी हे स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वभाववैशिष्टय आहे. त्यांच्या कार्याचा राज्यात दरारा होता. 
           कृषी संशोधक दत्तात्रय कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षणांतुन त्यांनी या परिसराचा कायापालट केला आणि आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहुन माहित नसलेल्या असंख्य गोष्टींचे ज्ञान आत्मसात केले, स्वतःमधील अज्ञान दुर केले. सार्वजनिक जीवनांत त्यांची सावली म्हणूनच आम्ही वाढलो.

          याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले,जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी,कामगार नेते मनोहर शिंदे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,अधिकारी विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देहु नगरपालिकेचे नगराध्यक्ष स्वप्नील काळोखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव, प्रसिध्द कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यांत आला. कारखाना कार्यस्थळावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सात दशकांचा चित्रात्मक प्रवास लावला होता. आमची प्रेरणा साहेब हया सेल्फी पॉईंटवर अनेकांनी सेल्फी घेतल्या. मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळयांची सजावट करण्यांत आली होती. रंगीबेरंगी फुगे लावण्यांत आले होते. संपुर्ण वातावरण स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवर्णीने भरून गेले होते. या कार्यक्रमाची अध्यक्षपदाची सूचना ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी मांडली त्याला अनुमोदन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे यांनी दिले.शेवटी आभार केन मॅनेजर जी बी शिंदे यांनी मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!