संवत्सर सह परिसरातील शाळांना साहित्याचे वाटप करुन " प्रेरणा दिन " साजरा
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल येथे माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांची जयंतीनिमित्त "प्रेरणादिन" म्हणून साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे तर अध्यक्षस्थानी माजी संचालक शिवाजी बारहाते उपस्थित होते.
प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी केले.यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शिवाजी बारहाते यांनी कै.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रेरणादिना निमित्ताने जनता स्कूलमध्ये ०३ सोलरचे हायमॅक्स व एक मोठे इन्व्हर्टर व बॅटरी देण्यात आली. तसेच संवत्सर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नऊचारी , लक्ष्मणवाडी, परजणे वस्ती, दसरथवाडी, बिरोबा चौक, वाघीनाला येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एक डिजिटल वॉच, फॅन व सतरंज्या यांचे वाटप करण्यात आले .
तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडित भारुड यांनी लिहिलेला माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या विजयी गाथा या डॉक्युमेंटरी फिल्म मधील त्यांच्या जीवनपटावर आधारित पोवाडा स्क्रीन वर सर्वांना दाखवण्यात आला.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री शिवाजीराव बारहाते, बापूसाहेब बारहाते, ज्ञानेश्वर परजणे, पांडुरंग शास्त्री शिंदे, बाळासाहेब शेटे, फकीरराव बोरनारे, त्र्यंबकराव परजणे, राजेद्र सखाहरी परजणे, महेश परजणे, रामभाऊ कासार, संभाजीराव बोरनारे, मुकुंद मामा काळे, विजय काळे, गणेश साबळे, किशोर परजणे, बापूसाहेब परजणे, गोविंद परजणे, अशोक लोहकने, अनिल भाकरे, प्रवीण भोसले, अशोक थोरात ,' योगेश परजणे, दिनकर बोरनारे, संदीप मैंद, प्रकाश बारहाते, सचिन शेटे, अनिल शेटे, शिवाजी शेटे, चिमाजी दैने, रवींद्र तिरमखे, किरण निरगुडे तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व कोसाका कारखान्याचे संचालक दिलीप बोरणारे आदि मान्यवर उपस्थित होते . सुत्रसंचलन सुनील वाघमारे ,खेताडे तर शेवटी आभार पंडित भारुड यांनी मानले.








