पुणे स्वारगेट घटनेनंतर शिवसेना महिला आघाडी अधिक सक्रिय.
कोपरगाव बस डेपोला अचानक भेट
कोपरगाव: ( लक्ष्मण वावरे )
पुणे स्वारगेट बस स्थानकात एसटी बस मध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर दक्षता म्हणून शिवसेना महिला आघाडी अधिक सक्रिय झाली आहे.
कोपरगाव येथेही महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांचे नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने कोपरगाव बस डेपोला अचानक भेट दिली.
बस डेपोत हजर असलेल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बस आगारातील त्रुटींकडे त्यांचे लक्ष वेधले.
महिलां सर्व बाबतीत सुरक्षित राहाव्यात यासाठी विशेष लक्ष दिले जावे.
परिसरात सिसिटीवी नेहमी कार्यान्वित राहतील याची काळजी घ्यावी.
विशाखा समितीची माहिती दर्शनी भागात लावणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता ठेवणे , महिलांना ती निःशुल्क उपलब्ध करावीत, हिरकणी कक्ष महिलांसाठी उपलब्ध करावा. प्रवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी.
चोरांपासून महिलांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसराची नेहमी स्वच्छता ठेवावी दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य दूर करावे अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली.
यावेळी वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर, व अमित हाम्पे, वाहतूक नियंत्रक राजेंद्र भागवत, लता देठे व इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते.
महिला आघाडी शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख विमल पुंडे यांचे सोबत कमल नरोडे, उर्मिला लोळगे, सुवर्णा दरपेल, रोहिणी पुंडे, रुपाली महाडिक, सोनाली धामणे आदी महिला उपस्थित होत्या.





