वैयक्तिक शासकीय कामे नियमित करून द्यावीत यासाठीच जनता दरबार . - नितीन शिंदे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
प्रस्तापित आमदार व माजी आमदार यांचा तथाकथित जनता दरबार म्हणजे सरकारी अधिकारी यांचा वैतागलेल्या जनते पासून मी बचाव करतो हे दाखवण्यासाठी केलेला केवळ फार्स असुन
ठराविक कालावधीत कोपरगांव सरकारी कचेरी मध्ये आमदार यांनी जनता दरबार घेऊन लोकशाहीचा दुसरा खांब हा किती दुबळा, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे याची जाणीव करून देणे व आमचे वैयक्तिक शासकीय कामे नियमित करून द्यावीत, असा संदेश देण्यासाठीच असल्याची टीका
प्रसिद्धीस दिलेल्या पञकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव नितीन शिंदे यांनी म्हटले आहे की
वास्तविक पाहता शासकीय गावठाण जमीनीवरील महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट चे बांधकाम निष्कासित करणे साठी महसूल विभागाने नगरपालिका यांना लेखी आदेश दिले असताना, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिक्रमण पाडणे अथवा निष्कासित करणेकामी जबाबदारी पार पाडली नाही.
मात्र सर्व सामान्य जनतेचे नुकतेच अतिक्रमण काढते वेळी कुठली ही माणुसकी दाखवली नाही. गरीब सामान्य जनतेला श्रीमंतांच्या अतिक्रमणाबाबत बोलायची हिमंत नाही,तर श्रीमंत नागरीकांना बोलायला त्या बाबतीत वेळ नाही. ह्याचा गैरफायदा लोकशाही तील दोन खांब जनतेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नुकताच घेतला आहे.
तिसरा व चौथा खांब म्हणजे न्यायालय व पत्रकार हे हल्ली खूप खर्चिक झाल्या मुळे सर्व सामान्य माणसाला लोकशाहीची ही व्यवस्था काय फक्त धनिकांसाठी असल्यासारखी असावी असा समज ह्या अतिक्रमण मोहीम निमित्ताने पक्का झाला आहे.
कोपरगांव शहर व तालुक्यातील ह्या सरकारी व राजकीय व्यवस्थापनाला पुर्ण पणे वैतागलेली आहे.अशा स्थितीत कधी हि मोठा उठाव होऊ शकतो. वातावरणाला निवळायला व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना सर्व जनतचा किती त्रस्त आहे, शासकीय यंत्रणेवर किती रोष आहे हे प्रात्यक्षिक रित्या दाखवायचे यासाठी असे जनता दरबार भरवले जातात व मीच तुम्हाला यातून वाचवू शकतो तेव्हा मी निर्देश करील तसेच कामे करा असा ह्या दरबारातून एक प्रकारे संदेश च दिला जातो.
पहिले सरकारी जमीनीवरील प्रस्थापित नेत्यांची अतिक्रमण निष्कासित करावीत व नंतरच जनता दरबाराचे आयोजन करावे.असेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नितीन शिंदे यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.





