banner ads

एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट

kopargaonsamachar
0

 एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची  महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव येथिल श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या  वनस्पीशास्त्र विभागातील एम.एस्सी.भाग १ च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच  म.फुले कृषी विद्यापीठातील ‘अळंबी-प्रक्रिया’ उद्योगास भेट दिली. त्यांतर्गत विद्यार्थ्यांनी राहुरी विद्यापीठातील अळंबी तंत्रज्ञान विभाग ,बियाणे प्रक्रिया विभाग, जैविक खते व कीटकनाशक विभागास  भेट देवून माहिती घेतली. 

सदर भेटीमध्ये अळंबी प्रक्रियेबाबत गोदागिरी फार्मचे संचालक  ऋषिकेश औताडे यांनी मशरूम /अळंबी लागवड कशी करावी त्याचबरोबर  अळंबी बीज प्रक्रियेपासून वितरणापर्यंत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील  विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेली अळंबी उच्च दराने विकत घेण्याची हमी दिली. याबरोबर जैविक खत प्रकल्पाबाबत  अभिजीत कोकरे यांनी, तर बीज प्रक्रियेबाबत श्री. ढगे यांनी, तर श्रीमती मनीषा नांगरे यांनी कीटकनाशक विभागाची  माहिती दिली.
या क्षेत्रभेटीसाठी मा. प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी परवानगी व मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात, “त्यांनी या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता जागृत होऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.” या क्षेत्रभेटीसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हंसराज मते,  समन्वयक डॉ.निलेश मालपुरे व विभागातील इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
प्रत्यक्ष  क्षेत्रभेटीमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.संकेत शिंदे, प्रा. योगेश खिलारी, प्रा.दिव्या निमसे आणि पदव्युत्तर वर्गाचे २३ विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी सहभाग नोंदविला.
         

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!