कृषीपंढरीचे वारकरी अर्थात - माजी मंत्री कै.शंकररावजी कोल्हे साहेब"
कोपरगाव -- लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यात येसगाव सारख्या छोट्या गावात जन्म घेऊन जिद्द व कर्तृत्वाच्या बळावर शेती व शेती पूरक पाणी,दूध व्यवसाय,सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात काम करत असताना स्वतःचा विचार न करता. काबाड कष्ट करणारा सर्व सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपल्या सोबत समाजातील गोर गरीब कष्टकरी याना सोबत घेऊन निघालेले व्यक्ती मत्व म्हणजे कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब हे कृषी पंढरीचे वारकरी होते .
साहेबांनी कोपरगाव तालुक्यात संजीवनी येसगाव - नाटेगाव गृप ग्राम पंचायतीच्या सरपंच पदा पासुन आपल्या राजकिय कारकिर्तीला सुरुवात केली पंचायत समितीचे सभापती आमदार मंत्री अशी विविध पदे भूषवली. संजिवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेती पूरक व्यवसाय म्हणून गोदावरी दूध संघाची उभारणी केली.
तालुक्यांतील शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजे व उच्च पदावर गेली पाहिजे म्हणून इंजिनियरिंग कॉलेज.त्या माध्यमातून विविध शिक्षण संस्था उभ्या केल्या.यशवंत कुकुट पालन संस्था साखरे पासुन उप पदार्थ तयार करण्याचे काम केले. तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रसंगी स्वतः ज्या पक्षात सामील आहे त्या पक्षाशी व नेत्यांशी संघर्ष करण्याची तयारी ठेवली. रयत शिक्षण संस्थेचे माध्यमातून अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.शेतकऱ्यांची बाजारात आर्थिक पत निर्माण व्हावी म्हणून देवयानी बँक व संजिवनी सहकारी पत संस्था उभी केली. रिझर्व्ह बँकेच्या अन्याय कारक धोरणा विरुध मोर्चा असो की एन्रॉन प्रकल्पाला विरोध असो पाट पाण्याचा प्रश्न या सर्वा मध्ये हिरारीने भाग घेऊन शेत करी हितासाठी सत्ता धाऱ्या सोबत विरोध पत्करला. गावो गावी कोल्हापूर बंधारे फळ बागा, भाजी पाला व फळ प्रक्रिया उद्योग असे शेतकरी हिताचे निर्णय घेतले. एक कृषी पंढरीचा वारकरी म्हणून शेती, पाणी शेती पूरक व्यवसाय, सहकार शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली.
या कृषी पंढरीच्या वारकर्यास जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन
🙏🙏🙏🙏
श्री. गणेश आप्पासाहेब मोरे पा.
सदस्य ग्रामपंचायत नाटेगाव







