बहादराबाद येथे शालेय साहित्य वाटून स्व. कोल्हे साहेबांना अभिवादन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सहकार महर्षी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत बहादराबाद व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बहादराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी स्व शंकररावजी कोल्हे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी बहादराबाद यांच्या वतीने साहेबांच्या प्रतिमेचेपूजन करून अभिवादन करण्यात आले.
“सेवा हाच धर्म “या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सामान्य ज्ञान स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी श्रेयश अजित पाचोरे,कार्तिकी सचिन,पाचोरे, क्षितिजा विक्रम पाचोरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उपस्थित सर्व ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत हनुमान मंदिर परिसर ते महादेव मंदिर परिसर स्वच्छता केली .
यावेळी आप्पासाहेब पाचोरे, साहेबराव पाचोरे, दत्तूआप्पा पाचोरे,दत्तात्रय पाचोरे, अण्णासाहेब पाचोरे, काकासाहेब पाचोरे, उल्हास पाचोरे,राजेंद्र पाचोरे,अनिल पाचोरे, गीताराम पाचोरे, दिनकर पाचोरे, निवृत्ती पाचोरे, निवृत्ती पाचोरे, शिवाजी पाचोरे, ज्ञानदेव पाचोरे, रवींद्र कुरकुटे ,दीपक आरोटे, रामनाथ पाचोरे,हिरामण माळी, मधुकर पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, पंकज जोंधळे,विक्रम पाचोरे, सरपंच अश्विनी पाचोरे, उपसरपंच आरती पाचोरे, अमोल पाचोरे, वैभव पाचोरे, आकाश पाचोरे, निलेश पाचोरे, सचिन पाचोरे, रावसाहेब दुबे, संजय पाचोरे, भाऊसाहेब दुबे, ज्ञानदेव पाचोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. तारडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच विक्रम पाचोरे यांनी केले तर आभार संजय पाचोरे यांनी मानले…








