banner ads

सौ.रेणुका कोल्हे यांची महाराष्ट्राच्या चॉकबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

kopargaonsamachar
0

 सौ.रेणुका कोल्हे यांची महाराष्ट्राच्या चॉकबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड


राज्यभर चॉकबॉल खेळाच्या प्रसार प्रचारासाठी   उपक्रम राबविणार

 
चॉकबॉल स्पर्धेचे मुलांच्या संघांचे विजेतेपद महाराष्ट्राकडे तर दिल्लीच्या मुलींच्या संघाची विजेतेपदाला गवसणी

कोपरगाव (लक्ष्मण वावरे )

शिर्डी येथे १४ वी राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धा संपन्न झाली आहे. यावेळी सैनिक विश्रामगृहाचे सैनिक हवालदार कुलदीप सिंग,राजेशकुमार पाल,संजीवनी शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकास विश्वस्त संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुका विवेक कोल्हे,वाल्मीक शिंदे,राजेश सिंग,स्पर्धा निरीक्षक अनिल मोट,प्रतिनिधी राकेश कुमार,मुख्य परीक्षक यदुराज शर्मा,टेक्निकल कमिटी चेअरमन हिमांशु दस्तीदार,व्हा. प्रेसिडेंट आय. टी. बी. एफ सुरेश गांधी, ऍड.संदीप गोंदकर,प्रदीप साखरे,जिल्हा सेक्रेटरी सुनीता कोऱ्हाळकर,मकरंद कोऱ्हाळकर,यांच्या उपस्थितीत पार पडले.महाराष्ट्राच्या चॉकबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून रेणुका कोल्हे यांची घोषणा आज आय. टी. बी एफ कडून करण्यात आली यावेळी त्यांचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुले आणि मुली असे स्वतंत्र संघ या स्पर्धेत सहभागी झालेले होते.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तर दिल्लीच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद खेचून आणले आहे.मुले द्वितीय दिल्ली,तृतीय पंजाब व वेस्ट बंगाल,मुली द्वितीय बिहार,तृतीय आसाम आणि वेस्ट बंगाल हे उपविजेत्या संघ ठरले.सर्वांना ट्रॉफी, मेडल,प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.अतिशय रोमांचक पद्धतीने सामने पार पडले.चोख नियोजन आणि उत्तम व्यवस्था यामुळे सर्व खेळाडूं आनंदी दिसून आले
महाराष्ट्र,आसाम,आंध्र प्रदेश,बिहार,दिल्ली,गोवा,गुजराथ, झारखंड,मध्य प्रदेश,पंजाब,राजस्थान, तेलंगणा,उत्तर प्रदेश,वेस्ट बंगाल आदींसह विविध राज्यातून संघ दखल झाले होते.आयोजक संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून खेळाडूंची निवास,भोजन,प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे.उष्णतेचा विचार करता खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय कक्ष व डॉक्टर उपलब्ध ठेवण्यात आले होते.
रेणुका कोल्हे बोलताना म्हणाल्या चॉकबॉल हा खेळ आपल्या ग्रामीण भागात अधिकाधिक खेळला जावा यासाठी आम्ही हे आयोजन चॉकबॉल असोसिएशन यांच्या समवेत नियोजन करून केले आहे.देशभरातील खेळाडू शिर्डी मध्ये यावे आणि या खेळाला ग्रामीण भागात लोकप्रियता वाढीसाठी आयोजन करण्यात आले आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य यासाठी लाभले आहे.तसेच असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,संजीवनी ग्रुप आणि संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.माझ्यावर जो विश्वास असोसिएशनने दाखवला आहे त्याबद्दल आभारी आहे.राज्यभर चॉकबॉल या खेळाचा प्रसार प्रचार होण्यासाठी उपक्रम राबविणार आहे.स्पर्धेसाठी देशभरातून आलेले संघ आणि त्यांचे प्रशिक्षक,सहकारी यांचे देखील अभिनंदन त्यांनी मनोगत व्यक्त करताना केले.ऍड.संदीप एकनाथ गोंदकर यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.शिर्डीमध्ये हे सामने भरविण्यासाठी गोंदकर यांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे.

डॉ.रश्मी वीज आय टी बी एफच्या सेक्रेटरी यांनी प्रकृती समस्येमुळे ध्वनिफीत पाठवत शुभेच्छा व्यक्त केल्या.आगामी काळात रेणुका कोल्हे यांच्या समवेत अधिक प्रभावी स्पर्धा आयोजन करू. संजीवनी ग्रुपने केलेल्या या स्तुत्य आयोजनाबद्दल वीज यांनी कौतुक व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.यावेळी ललित प्रजापती,राकेश कुमार,धर्मराज दुबे,ब्रजेश गुप्ता, जगप्रीतसिंग,गिरीश गावकर,व्यंकटेश,सुधाकर,जडेजा ,शिवराम आदी सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!