banner ads

डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काळे गटाचे दिगंबर पवार बिनविरोध

kopargaonsamachar
0

 डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काळे गटाचे दिगंबर पवार बिनविरोध 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ) 

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे दिगंबर प्रभाकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आ. आशुतोष काळे व माजी सरपंच संजय गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोटेशन पद्धतीने प्रत्येक सदस्याला उपसरपंच पदाचे जबाबदारी दिली जाते. अश्विनी देविदास पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड घेण्यात आली. निवड प्रक्रियेचे अध्यक्षस्थानी सरपंच नेहा गुरसळ होत्या. निवड प्रक्रियेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर पाडेकर यांनी पाहिले. त्यांना सचिन गुरसळ, श्री माळी, श्री जाधव,सुनील माळी यांनी मदत केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पवार, सलीम सय्यद, रईसाबानु सय्यद, धनश्री गुरसळ, सुभाष पुंगळ, भिमाबाई पीठे, माजी सरपंच संजय गुरसळ,जिंनीगचे संचालक शंकर गुरसळ, पंकज पुंगळ, बाळासाहेब गुरसळ, गोकुळ गुरसळ, बालमभाई सय्यद, चंद्रकांत गुरसळ, दादाभाई सय्यद, वेणुनाथ पवार, बाळासाहेब पिठे, दौलत गुरसळ, मच्छिंद्र गुरसळ, मोहन गुरसळ, मुन्नाभाई सय्यद, अर्जुन होन, देवा पवार, सर्जेराव गुरसळ, मच्छिंद्र गुरसळ, शाहरुख शेख, मुस्ताक सय्यद, शैलेश पवार, अश्विन पुंगळ, चांद सय्यद, महबूब सय्यद, किरण गुरसळ, श्रीकांत गुरसळ, जनार्दन पवार, योगेशभाउ पवार,माणिक चव्हाण, बाबासाहेब गुरसळ, संजय गुरसळ, मोहन गुरसळ, प्रदीप ठोंबरे, योगेश पवार आधीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच नेहाताई गुरसळ व माजी सरपंच संजय गुरसळ यांच्या हस्ते उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिगंबर पवार यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना पवार यांनी सांगितले की गावच्या विकास कामासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू , उपसरपंचपद मिळाल्यामुळे आणखी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर पाडेकर यांनी केले तर आभार माजी सरपंच संजय गुरसळ यांनी मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!