चास नळी चे युवक चालवतात संत गाडगेबाबांचा वारसा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
संत गाडगेबाबा यांनी आयुष्यावर स्वच्छतेचे व्रत अंगीकारले होते. दिन दुबळ्यांची त्यांनी सेवा केली. लोकांच्या मनातील अज्ञान व अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबाचा आदर्श घेऊन त्यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील युवक करत आहे.
दर रविवारी ग्रामस्वच्छता करण्याचे गावातील काही तरुण करत आहे. ग्रामस्वच्छतेसोबत स्मशानभूमीची स्वच्छता ठेवण्याचे काम ते नियमितपणे करत आहेत. इतकेच नाही तर लोकांच्या मनातील भुताबद्दलच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात म्हणून ते स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करतात. दिवाळीत सामुहिक फराळ सेवन करत ते लोकांच्या मनातील स्मशानाची भिती दुर करतात. चासनळी येथुन गोदावरी नदी वाहते.त्यामुळे नदीपात्रात भंगलेल्या मुर्त्या, फोटो व निर्माल्य नदीकिनारी व नदीपात्रात टाकतात.त्याची स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण काम ते करत आहे. वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. गरजु व्यक्तीस ते मदत करत असतात.त्यांच्या या कार्याची पंचक्रोशीत प्रशंसा होत आहे. गाडगेबाबाचे चित्र पोशाखावर परिधान करुन ते स्वच्छते काम करत असतात.तरीही कृतीने ते गाडगेबाबांचा वारसा जपत आहे.या कार्यात सचिन चांदगुडे,संतोष पऱ्हे ,शाम कासार,कैलास माळी,विजय चव्हाणके,बाळासाहेब सैंदाणे, सुनील चांदगुडे,सुखदेव माळी ,बापू कासोदे
आढाव साहेब,सुरेश.आष्टेकर,शांताराम बिरुटे,बबन गाडे,भाऊसाहेब चांदगुडे,प्रथमेश चव्हाणके,वेदांत चांदगुडे हे सहभागी होतात. नुकताच वेदांत चांदगुडे याचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला.गाडगेबाबा जयंती निमित्त त्यांच्या कार्यास सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.



.jpg)


