धारणगावच्या गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांवर पुन्हा कारवाई
कारवाई चे नागरिकांनी केले स्वागत
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील धारणगाव येथिल गोदावरी नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा कारवाई करत शिर्डी विभागाचे प्रांतआधिकारी माणिक आहेर,कोपरगावचे तहसिलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोदापाञातुन अनधिकृत गौण खनिज फरांडीने उत्खनन करणारे दोन ट्रॕक्टर पकडून तहसील कार्यालय कोपरगांव येथे जमा करत रवंदेचे मंडळाधिकारी जाफर पठाण, कोपरगावचे मंडळाधिकककारी श्री पोकळे , माहेगाव देशमुख चे तलाठी भगवान मधे ,कुंभारी चे तलाठी नितीन सांगळे,कोपरगाव चे तलाठी जगदीश शिरसाठ ,धारणगाव चे तलाठी धनंजय पऱ्हाड यांच्या पथकाने मोठा दणका दिला आहे,माञ वाळू तस्कर ट्रॕक्टर व वाळू उपसा करण्याचे साहित्य सोडून पळून गेले
शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी राञी ११ ते १२ वाजे दरम्यान तालुक्यातील धारणगाव येथे गोदावरी नदी पात्रात केणी च्या सहाय्याने अवैध रेती उपसा चालू असल्याची माहिती सदर पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच सदर पथक. गोदावरी नदी पात्रात उतरत असताना अधिकारी यांना पाहून केणी चालक व त्यांच्या सहकार्यांनी तेथून पळ काढला. संबंधित केणी दोन,ट्रॅक्टर व अन्य साहित्य जप्त करून तहसील कार्यालय कोपरगाव येथे पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी अडकावून ठेवण्यात आले तर अशाच प्रकारची कारवाई दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मौजे धारणगाव येथे नदी पात्रात करण्यात आली होती त्या कारवाईत गोदावरी नदी पाञात वाळू उत्खनना करता टाकलेले दोरखंड व फरांड्या तहसीलदार महेश सावंत यांच्या आदेशाने संयुक्त कारवाईत पकडण्यात येऊन जाग्यावरच जाळुन नष्ट करण्यात आले.पाच दिवसात दुसऱ्यांदा अशा प्रकारची कारवाई झाल्याने सदर परीसर अवैद्य वाळू उपशाचे माहेर घर बनते की काय असा प्रश्न नागरिकांना पडला असुन या परीसरातुन गोदावरी नदीची चोरी करुन महसुल च्या हातावर तुरी देत पळुन जाण्यात यशस्वी होत असलेल्या वाळु चोरांना महसुल विभागाने सापळा रचुन जाग्यावरच पकडण्यासाठी वेगळ्या पध्दतीने सापळा लावावा अशी मागणी होत असुन रवंदेचे मंडळाधिकारी जाफर पठाण, कोपरगावचे मंडळाधिकारी श्री पोकळे , माहेगाव देशमुख चे तलाठी भगवान मधे ,कुंभारी चे तलाठी नितीन सांगळे,कोपरगाव चे तलाठी जगदीश शिरसाठ ,धारणगाव चे तलाठी धनंजय पऱ्हाड यांच्या पथकाने या वाळू तस्करांवर केलेल्या कारवाई चे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.






