पोलीस भरतीत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे यश
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या ‘मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत’ सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. यामध्ये दीपक माधव आरणे व अजय हरिभाऊ पगारे यांना कॉन्स्टेबलपदी नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. संजय गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आहे.



.jpg)




