कोपरगावातील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत काढणारच-- मुख्याधिकारी सुहास जगताप
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहर व उपनगरांमधील वाढलेल्या अतिक्रमण बाबत कोपरगाव नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणची रस्त्यांची मोजणी व रस्त्यांवर अनाधिकृत असलेले अतिक्रमणे याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाच्या फुल्या मारण्यात आलेल्या आहे.
मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले की सात दिवसांची मुदत देणार असून त्यानंतर मात्र प्रशासना मार्फत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसातच अनाधिकृत अतिक्रमण निघणार हे मात्र नक्की.








