banner ads

गुरु शुक्राचार्य महाराजांवरील पुस्तकाचे व वेबसाईट चे अनावरण

kopargaonsamachar
0

 गुरु शुक्राचार्य महाराजांवरील पुस्तकाचे व वेबसाईट चे अनावरण

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
गुरु शुक्राचार्याच्या तपोबलाने पावन झालेल्या कर्मभूमीचे दर्शन, पविञ अशा संजीवनी मंत्राच्या उगम स्थान, कच आणि देवयानी यांच्या विश्वातील पहिल्या प्रेम कथेच्या ठिकाणाचे दर्शन शुभकार्यास विवाह मुहूर्त न पाहता लागण्याचे एकमेव ठिकाण, क्षत्रिय राजा ययाती व देवयानी यांच्या विश्वातील पहिल्या अंतरवर्णीय विवाहाचे ठिकाण . गुरु शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राच्या सिद्धतेसाठी कोपरगावच का निवडले याचे भौगोलिक व अध्यात्मिक महत्त्व सांगणारे ठिकाण परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर या व इतर विषयांची सखोल माहिती जगभरातील भाविकांना होण्यासाठी ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी तयार केलेल्या " www.gurushukracharyamandir.com "
 वेबसाईट व   संकलीत केलेल्या हिंदीतील "श्री शुक्र नित्य सेवा "  व राजेंद्र कमलाकर मुळे लिखीत " शुक्राचार्य स्तवन " तर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळूजी आव्हाड लिखीत " शुक्रतीर्थ " पुस्तकाचे अनावरण व प्रकाशन प्रसिद्ध वास्तूतज्ञ शशिकांत वांद्रे,कोपरगावचे मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील,यांच्या हस्ते परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट येथे करण्यात आले.

    सदर प्रसंगी  भाविकांच्या उपस्थितीत डॉ, राजेंद्र कमलाकर मुळे , ज्योतिषाचार्य मनीष गोसावी, ओंकार आव्हाड ,शशिकांत वांद्रे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा मंदिर प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर   देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले की सध्या प्रयागराज येथे सुरू असलेला १४४ वर्षानंतर  आलेला महाकुंभ निमित्त  व बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी  महाशिवरात्रीच्या दिवशी असलेली शेवटची पवित्र स्नानाची पर्वणी लक्षात घेता मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचे नियोजन ,मंदिराची सजावट मंदिरामध्ये होणाऱ्या पूजा व या पवित्र पर्व काळानिमित्त भक्तांना अभिषेक करता यावा यासाठी प्रशासनाने नाममात्र दरात दिवसभर सामुदायिक अभिषेकाची सोय केलेली आहे यासाठी लागणारे सर्व साहित्य मंदिर प्रशासनामार्फत दिले जाणार आहे. महाशिवरात्री उत्सवानंतर पुन्हा येणाऱ्या रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व शुक्र भक्त व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन  संभाजीनगर येथिल  धर्मवीर अग्रवाल सुपुत्र श्री लाला दुर्गादास मित्तल यांच्यातर्फे आयोजित  करण्यात आले आहे तरी भाविकांनी या पर्वकाल व महाशिवराञी निमित्त  शुक्राचार्य महाराज दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे सदर पत्रकार परिषदेसाठी बाळासाहेब आव्हाड ,अॕड संजीव कुलकर्णी ,अॕड गजानन को-हाळकर, सुवास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन ,सचिन परदेशी ,प्रसाद प-हे, संजय वडांगळे, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे ,विलास आव्हाड, दत्ताञय  सावंत, महेंद्र नाईकवाडे, राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजयराव रोहम, विलास आव्हाड ,दिलीपराव सांगळे ,विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे ,आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी ,विशाल राऊत ,राजाराम पावरा, आदी उपस्थित होते.

शिव पिंडीस चांदीचा मुलामा

 गुरु शुक्राचार्य मंदिरातील शिवपिंडीस चांदीचा मुलामा देण्यासाठी भक्तांना आवाहन करीत असतो, त्याला प्रतिसाद म्हणून कोपरगांव येथील व्यापारी कै.मोहनशेठ झंवर याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई झंवर व परिवाराच्या वतीने सव्वा किलो चांदी शुक्राचार्य महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे.         



i

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!