कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॕड. शंकरराव (मामा) आढाव यांचे निधन
कोपरगाव ----
कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव (मामा) सखाराम पा. आढाव (वय ८५) यांचे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजता निधन झाले आहे.
अॕड. स्व. शंकरराव आढाव यांनी कोपरगांव न्यायालयात ५० वर्षापेक्षा जास्त काळ विधी सेवा दिली. गोदावरी नदी परिसरातील सर्व धरणे प्रत्यक्ष फिरुन कोपरगांवच्या शेती पाण्याच्या अभ्यास केला. गोदावरी कालव्यांवर आधारित कोपरगांवचे शेती पाण्याची लढाई त्यांनी सरकार विरुद्ध न्यायालयात जिंकली होती.
स्व. शंकरराव आढाव हे मराठा पंच मंडळचे अध्यक्ष, कोपरगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशा विविध पदांवर कार्यरत राहून पथदर्शी कार्य केले.
त्यांचे पश्चात पत्नी प्रगतशील शेतकरी रंजनाताई, बंधू डॉ. शांताराम, डॉ. शिरीष, शिवाजीराव यासह चार विवाहित बहिणी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोपरगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वैभव आढाव आणि मराठा पंचाचे विश्वस्त मंदार आढाव यांचे ते वडील होते. सर्वामध्ये ते 'मामा' या नावाने परिचित होते.
त्यांचे पार्थिवावर दुपारी ४:३० वाजता अमरधाम कोपरगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




.jpg)



