banner ads

संजीवनी च्या आठ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

kopargaonsamachar
0

 संजीवनी  च्या आठ अभियंत्यांची  नोकरीसाठी निवड


  संजीवनीचा ऑटोनॉमस दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण  तयारीने विद्यार्थी कंपन्यांच्या कसोटीस पात्र

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ( टी अँड  पी) विभागाच्या पूर्व तयारीने व संपर्काने अलिकडेच ब्लु स्टार इंडिया या घरगुती व औद्योगीक उपकरणे बनविणाऱ्या  कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून आठ नावोदित अभियंत्यांची वार्षिक  पॅकेज रू ६. १३ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे, संजीवनीचा ऑटोनॉमस दर्जा आणि टी अँड  पी विभागाच्या वैशिट्यपूर्ण  तयारीने  विद्यार्थी अनेक कंपन्यांच्या कसोटीत पात्र होत आहेत, अशी  माहिती संजीवनी महाविद्यालयाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिद्धी  पत्रकाद्वारे दिली आहे.

           संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मार्फत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या वर्षापासूनच  त्यांना तीन पर्याय दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर पहिला पर्याय म्हणजे नामांकीत कंपनित चांगल्या वार्षिक  पॅकेजची नोकरी हवी आहे काय?,दुसरा पर्याय एम.टेक., एम.एस.च्या उच्च शिक्षणासाठी जायचे आहे काय?, आणि तिसरा पर्याय म्हणजे ऊद्योजक बनायचे आहे काय?. वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना प्रशिक्षित  केल्या जाते. याचा परीपाक म्हणुन नोकरी अपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना कंपनी निहाय अधिकचे प्रशिक्षण  दिल्या जाते व वेगवेळया कंपन्या या टी अँड  पी विभागाने केलेल्या समन्वयानुसार संस्थेत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करतात.
               यानुसार अलिकडेच ब्लु स्टार इंडिया कंपनीने घेतलेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये अंतिम वर्षातील  मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या प्रणाली विलास  चव्हाण, संस्कृती संतोष  गंभिरे, कौशल  रमेश  कदम, धनश्री साईनाथ तिपायले, महेश  दिलीप ससे, दर्शन न अनिल गुंजाळ, शुभम ज्ञानेश्वर  सगर व इेलेक्टॉनिक्स अँड  कॉप्म्युटर इंजिनिअरींगच्या प्रविण दिलीप कुडके यांची नोकरीसाठी निवड केली. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेच्या व्यवस्थापना प्रति  कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 
 मी कोपरगाव येथिल रहिवासी असुन आई गृहिणी आहे. वडील शेती करतात. आमच्या टी अँड  पी विभागाने कंपनी निहाय तंत्रज्ञानाबाबत आमच्याकडून भरपुर तयारी करून घेतली. मुळात आमच्या कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  आमच्या अभ्यासक्रमात असल्यामुळे आम्ही तंत्री प्रश्नांमध्ये  कोठेच कमी पडलो नाही. कंपनीने प्रथम आमची योग्यता ( अप्टिट्युड ) चाचणी घेतली, नंतर समुह चर्चा (ग्रुप डिस्कशन) घेतले, मुळ ज्ञानावर एचआर राउंड झाला  आणि दोनदा तांत्रिक ज्ञानावर आधारीत मुलाखती झाल्या. या सर्व बाबी टी अँड  पी विभागाने आमच्याकडून सरावाच्या वेळी करून घेतल्या होत्या, त्यामुळे कंपनीच्या सर्व कसोट्या  यशस्वीपणे पूर्ण केल्या, आणि मला माझ्या अंतिम निकाला अगोदरच वार्षिक  पॅकेज रू ६, १३ लाख पॅकेज असलेली नोकरी मिळाली. माझ्या शेतकरी कुटूंबात मुलगी म्हणनु मी प्रथमच नोकरदार होत आहे, याचा सर्व कुटूंबियांना आनंद होत आहे. याचे सर्व मी संजीवनीच्या व्यवस्थापनास व त्यांच्या टीमला देते.-
 संस्कृती गंभिरे.
निवड  झालेली अभियंता

संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व झालेल्या नवोदित अभियंत्यांच्या व पालकांचे अभिनंदन करून नवोदित अंभियंत्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच तत्कालीन डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर आणि त्यांच्या टीमचे सातत्यपुर्ण परीश्रमाबध्दल कौतुकही केले.   
 

  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!