banner ads

चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वसिम शेख

kopargaonsamachar
0

 चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वसिम शेख 


कोपरगाव ( लक्ष्मण  वावरे )

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न होवून आ.आशुतोष काळे गटाचे वसीम सय्यदनूर शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चांदेकसारे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सचिन होन यांनी रोटेशन नुसार  आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच किरण होन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यदनूर शेख यांनी आपला उमेदवारी  अर्ज दाखल केला होता. त्यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यदनूर शेख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असेलल्या ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी वसीम सय्यदनूर शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.


 यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख म्हणाले कीचांदेकसारे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू. सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासाचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, गौतम बँकेचे संचालक शरद होन, सरपंच किरण होनमावळते उपसरपंच सचिन होन ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ सोळसेअशोक होन, गंगुबाई होन,नंदाबाई होनसुनिता खरातजरीना शेखरेखा गायकवाड, सुवर्णा होनसुनिल माळी, कुंदाबाई खंडिझोडतसेच माजी सरपंच मतीन शेख, विलास चव्हाण,रवींद्र खरातजयद्रथ होन,अभिजीत झगडे,राजेंद्र होन,गणेश खरात,युनूस शेख,दगुभाई शेखसुनील होनसागर होन, सुधाकर होन, युनूस सय्यद,मधुकर खरात, दगू होन,बाळासाहेब खंडिझोडमनोज होनसय्यदनूर शेख,नूरमोहम्मद शेख, हसन शेख,रावसाहेब होन,अदनान सय्यद,युसुफ सय्यद,अन्वर शेख,किरण होन,संतोष होननिलेश होनराजाभाऊ होन,संजय होन,पुंजाभाऊ होन,संजय गुजर,नबाजी नन्नवरेसुनील होनकर्णा चव्हाणमधुकर होन,तुळशीदास होनआदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!