नाटेगाव - नांदेसर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरु
👉 ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जी पणा ,
👉 होणाऱ्या परिणामांना तहसिलदार, गटविकास अधिकारी जबाबदार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नाटेगाव येथील ग्रामपंचायत नाटेगाव यांचा गट नं. १ क्षेत्र १५ गुंठे वरील लगतच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढून रस्ता मजबुतीकरण व कॉन्क्रीटीकरण करावे यासाठी अनेक वेळेस मागणी करुनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने विद्यार्थी ,शेतकरी ,ग्रामस्थांना चालण्यासाठी रस्ताच व्यवस्थित नसल्याने मोठे हाल होत असल्याने ग्रामस्थांनी वरीष्ठांना सांगुनही कोणतीच दखल घेतली नसल्याने नाटेगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणास बसले असुन आता होणाऱ्या परीणामांना ग्रामपंचायत सह वरीष्ठ प्रशासन जबाबदार असणार असल्याचे प्रकाश मोरे,अॕड दिपक पोळ,अॕड.नितीन पोळ सह चाळीस शेतकरी ग्रामस्थांनी आपल्या सही निशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ,कोपरगावचे तहसिलदार,तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सह ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिले आहे.
दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की सुमारे पाच ते सात महिन्यांपासून रस्ता कॉन्क्रीटीकरण करावे म्हणून आम्ही विनवण्या करीत आहोत. मात्र तुमचेपैकी ग्रामसेवक हे उडवाउडवीची उत्तरे देतात व वेळ मारून नेतात.
वास्तविक सदरचा नाटेगाव नांदेसर हा रस्ता गट नं. १ मधून अनेक वर्षांपासून वहिवाटीचा आहे. त्या रस्त्याने संत तुकाराम माध्यमिक विद्यालय नाटेगाव, जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारे विद्यार्थी, शेतकरी,दुध उत्पादक , शेतमाल वाहून नेणारे शेतकरी यांची वाहने व इतर सर्वांनाच पावसाळ्यात अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्ता कच्चा असल्याने वाहने चिखलात फसतात, रुग्णांना दवाखान्या पर्यत नेता येत नाही . मृतदेह देखील पाण्यातून न्यावे लागतात. पायी जाणारे व्यक्ती घसरून पडतात व प्रसंगी मारही लागतो.
तसेच उत्तर दक्षिण जाणारे वर नमूद रस्त्याचे पूर्व व पश्चिम बाजू कडील शेतकरी रस्त्यावर काट्या साबरकांड्या टाकतात, प्रसंगी नळी टाकून रस्त्यावर पाणी सोडतात, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात, रस्त्याने जा ये करणे दुरापास्त होते. प्रशासनास वेळोवेळी लेखी ,तोंडी अनेक वेळेस निवेदन दिलेले आहे विनंतीही केली माञ रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जाणुन बूजून टाळाटाळ केली जात आहे .
सदर रस्ता हा सुमारे शंभर वर्षा पासून वहिवाट असलेला रस्ता असुन या भागात गावातील अनेक ग्रामस्थ शेतात वस्ती करून राहतात त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक वेळा कऱण्यात आली . गावापासून साधारण चार पाचशे फूट रस्त्याचा भाग खोलगट असल्याने या ठिकाणी पाणी साचून रस्त्याने ये जा करणे अवघड झाले त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती तत्कालिन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी केली व बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना रस्त्याच्या कामाबाबत आदेश दिला त्यातून या भागात चार पाचशे फूट रस्त्यावर काँक्रीटिकरण मंजूर केले पावसाळ्याच्या सुरुवातीला या रस्त्याला निधी मिळाला कामाचे टेंडर निघाले टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली मात्र अजुन कामाला सुरूवात झाली नाही ग्रामस्थांनी वेळोवेळी काम सूरु करावे अशी मागणी केली मात्र ग्रामसेविका यांच्या निष्काळजी पना मूळे अद्याप काम सुरु झाले नाही वेळोवेळी मागणी विनंती करुनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नाईलाजास्तव आम्ही आमचे सर्व कुटुंबियांसह व विद्यार्थी मुलांसह ग्रामपंचायत नाटेगाव कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
、






