जीवनात प्रवृत्ती व निवृत्तीचा समतोल गरजेचा - डॉ. अंकित कृष्णानी
जेष्ठ नागरिक व्याख्यानमाला संपन्न
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
“जीवन जगणे ही एक कला असून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहपूर्वक व उमेदीने जीवन जगावे, ध्यान हे विश्राम करण्याची कला आहे. त्यातच जीवन हे संमिश्र असून जीवनात प्रवृत्ती व निवृत्तीचा समतोल गरजेचा आहे. त्यातच आनंद मानण्याची प्रवृत्ती बाळगली तर निवृत्ती सोपी जाते”. असे मत डॉक्टर अंकित कृष्णानी यांनी व्यक्त केले.
सदर व्याख्यानमालेत संदीप नलगे यांनी, “शरीर, मन व बुद्धी जेव्हा एकत्र येतात तेव्हा योग होतो. जीवनामध्ये योगाचे महत्त्व किती आहे, हे त्यांनी उपस्थिततांना योग प्रात्यक्षिके करून दाखविली, जीवनात ध्यान आल्याशिवाय जीवन ध्यानात येत नाही.” असे उद्गार याप्रसंगी त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, “महाविद्यालयाच्या स्थापनेपासून गौरवपूर्ण इतिहासाची उपस्थितांना ओळख करून दिली. तसेच केंद्र व राज्य सरकार जेष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना राबवते.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विमा, राष्ट्रीय वृद्ध योजना, बचत गट, पेन्शन योजना, राष्ट्रीय नागरिक योजना आदींविषयी माहिती सांगून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय बहि:शाल कमिटीचे चेअरमन डॉ.माधव यशवंत यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक व योगगुरु उत्तमभाई शहा, सुधाभाभी ठोळे, .विजय बंब, प्राचार्य डॉ.काकडे,.श्रीमती रजनीताई गुजराथी,. अनिल देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. सदर व्याख्यानमालेसाठी कोपरगाव परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



.jpg)




