माणसाचे हसणे कमी होणे ही गंभीर समस्या”- सलील पुळेकर
(एस.एस.जी.एम महाविद्यालयात कौशल्य सक्षमीकरण आणि तणाव व्यवस्थापन कार्यशाळा)
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
-“भूतकाळातील नकारात्मक भावना आणि भविष्याची चिंता यामुळे मनुष्य जीवन कठीण होत चालले आहे. स्वतःतील क्षमतांची ओळख नसणे, त्याचबरोबर वेळेचा सदुपयोग करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आपली प्राणशक्ती वाढवणे व मनाला वर्तमान काळात ठेवणे या गोष्टीची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी सुदर्शनक्रियेने पार पाडू शकतात. या क्रियेमुळे झोपेची क्रिया सुधारून मेंदूच्या क्रिया वाढवण्यास मदत करते व हार्मोनची क्रिया संतुलित करण्यास मदत करते. सुदर्शन क्रियेने कामात व यशाची शक्यता वाढते. आज रोजी १८० पेक्षा जास्त देशांमध्ये आर्ट ऑफ लिविंग चे कार्य चालू आहे. ज्या देशांमध्ये वीज पुरवठा शक्य नाही, अशा देशांमध्ये सुद्धा शिक्षणासाठी आर्ट ऑफ लिविंग ही संस्था कार्य करते. असे प्रतिपादन सलील पुळेकर यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, “ताण तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे. शिक्षकच जर तणावात असतील तर विद्यार्थी जास्त प्रमाणामध्ये तणावात येतील.
त्यासाठी शिक्षकांनी वर्तमानकाळात वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन केल्यास तणाव निश्चितच कमी होईल. याबरोबरच समाजात वावरताना सामाजिक बांधिलकी जपावी. सुदर्शन क्रियेने जगणे सुसह्य होते. सुदर्शन क्रिया ही आरोग्यासाठी हितकारक आहे. आणि कोणतीही क्रिया करत असताना त्यामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन केले.



.jpg)




