banner ads

शिवसैनिकांनी घर तेथे शिवसैनिक उभा करावा -- अजय बोरस्ते

kopargaonsamachar
0

 शिवसैनिकांनी  घर तेथे शिवसैनिक उभा करावा -- अजय बोरस्ते


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ) 
ज्यावेळी शिवसेना हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांपासून दूर गेली तेंव्हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. त्याची परिणीती महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली जनतेची सेवा, महाराष्ट्रातील महिला,  कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी  असंख्य योजना दिल्या . त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान वाढला
असुन बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या शिवसेनेचं सक्षम नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या  कडेच जाते हे सिद्ध झाले  या शिवसेना परिवाराचे सदस्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुढे येत आहेत.‌ शिवसैनिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन घर तेथे शिवसैनिक उभा करावा असे आवाहन शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले. 

शिवसेना सभासद नोंदणी संदर्भात आढावा बैठक  शिर्डी येथील विश्रामगृह येथे पार पडली यावेळी बोरस्ते बोलत होते.
 
शिर्डी लोकसभा  मतदारसंघात आम्ही दोन्ही जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी शिवकार्य सदस्य नोंदणी करू असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. 
यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सौ . विमल पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीनराव औताडे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव, राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे, राहता तालुका प्रमुख सागर बोठे, कोपरगाव शेतकरी सेना तालुका प्रमुख  बाबासाहेब बढे, कोपरगावचे रावसाहेब थोरात, युवासेनेचे अभिषेक आव्हाड, राहाता तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव, श्रीरामपूर तालुका प्रमुख सविता वाडीले , कोपरगाव तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे व आरती गाडे, मुमताज शेख, अक्षय सदाफळ,अमोल महाले,युवा सेना तालुका प्रमुख प्रणीत भालेराव, प्रतीक वाकचौरे, साई वाणी, संग्राम सदा फळ या सह कोपरगाव , संगमनेर,  श्रीरामपूर , राहाता, नेवासा, अकोले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!