banner ads

समताच्या शौर्य पाटणीचे समुद्र जलतरण स्पर्धेत यश

kopargaonsamachar
0

 समताच्या शौर्य पाटणीचे समुद्र जलतरण स्पर्धेत  यश


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 भारतीय जलतरण महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ६१ व्या संक रॉक लाईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया या ५ किलो मीटर लांबीच्या समुद्र जलतरण स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता सातवीतील शौर्य जितेंद्र पाटणी या विद्यार्थ्यांने उल्लेखनीय कामगिरी करून पदक मिळवून जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे स्विमिंग प्रशिक्षक अनिल मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
      संक रॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया हा मार्ग समुद्रातील जलतरणासाठी एक आव्हानात्मक मानला जातो. या मार्गावर जलतरण करताना स्पर्धकांना समुद्राच्या लाटा, वारा आणि पाण्याच्या प्रवाहासारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

 अशा अवघड परिस्थितीत शौर्य पाटणी यानी आपल्या धैर्य, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशस्वी जलतरण करून पदक मिळवत समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्कृष्ट यश संपादन करतात. त्या प्रमाणे क्रिडा क्षेत्रातही उत्कृष्ट यश संपादन करतात.
       शौर्य पाटणी याने समुद्रातील जलतरण स्पर्धेत यश मिळवत एक युवा जलचर चॅम्पियन म्हणून स्वतःमधील क्षमता सिद्ध केले आहे. समताचे विद्यार्थी समताने उभारलेल्या भव्य स्विमिंग पुलामध्येच पोहत नाही तर समुद्रात देखील होत असल्याचे शौर्यने सिद्ध करून दाखविले आहे. 
     शौर्यच्या या अतुलनीय कामगिरी बद्दल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मोहन कुकरेजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जलतरणपटू डॉ.विलास आचार्य, सौ.सुषमा आचार्य, नीता पाटील, राजेश्वरी पवार, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, पालक जितेंद्र पाटणी व सौ.नेहा पाटणी, प्राचार्य डॉ.विनोद चंद्र शर्मा आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कोपरगाव तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!