प्रा. सौ. पल्लवी औताडे ( मोरे )यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी सौ. पल्लवी अरविंद औताडे ( मोरे ) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधानंतर पि एच डी ( डॉक्टरेट ) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. सौ. पल्लवी औताडे यांनी चंद्ररुप डाकले जैन काॅलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथील केंद्रातून " उत्तर महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी साखर कारखान्याच्या संघटन व व्यवस्थापनाचा चिकित्सक अभ्यास " या विषयावर प्रबंध सादर केला होता.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. बखळे एस आर , सहाय्यक मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. भागवत ए बि यांनी मार्गदर्शन केले. शोध प्रबंधासाठी प्राचार्या डॉ. व्हि. एन. गुरसळ, डॉ. बारहाते जी एच यांनी सहकार्य केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्यानंतर प्रा. सौ पल्लवी अरविंद औताडे यांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.





