banner ads

कोपरगाव शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जाणार?

kopargaonsamachar
0

 कोपरगाव शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जाणार? 

अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोझर चालणार

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

श्रीरामपूर-संगमनेर तालुक्या नंतर आता कोपरगाव शहरात अतिक्रमणविरोधी मोहिम राबवण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.कोपरगाव शहरातील वाढणारे  अतिक्रमणे आणि नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.


मंगळवारी (दि. ४) रोजी कोपरगाव शहरात दिवसभर नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ, रचना सहाय्यक किरण जोशी, रश्मी प्रधान,प्रभारी आरोग्य निरीक्षक बापू हरणे,राजू तुझारे,मनोज लोट यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी फौज फाट्यासह कोपरगाव  शहरातील अतिक्रमित भागात दाखल झाले यावेळी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर मोजमाप करण्यात आले आहे त्या ठिकाणी लाल निशान करण्यात आले आहे.


कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार संबंधित मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते,फूटपाथ,सार्वजनिक जागेवर केलेल्या अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होवूनयामुळे पायदळी चालणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होतो.शहराच्या मुख्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचा श्वास कोंडला असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे कुठेतरी अतिक्रमण संपूष्टात येणे गरजेचे असून नागरिकांकडून नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या अनेक तक्रारीमुळे कोपरगाव नगरपरिषद ऍक्शन मोडवर आली आहे यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दाणाणले आहे.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अतिक्रमणास लगाम घालण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासनामार्फत सदरचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नगर परिषदेमार्फत नोटीस बजावली जाणार आहे.या मोहिमेत पुढे जावून कशी कारवाई होणार का? शहरातील अतिक्रमण हटणार का? या गोष्टी कडे शहरातील सर्वच नागरिकांचे व व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.


तर कोपरगांव शहरात सण २०११ साली मोठी अतिक्रमण मोहीम राबवत अनेक छोटे छोटे व्यावसायिकांचे व्यवसाय उध्वस्त झाले. 
मात्र पंधरा वर्षांत आजही विस्तापित खऱ्या अर्थाने विस्थापित आहेत.मागील कालावधीत धन दांडग्यानी पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेच्या जागेवर अतिक्रमण केले. अनेक जणांनी सुशोभीकरण करून जागा अडवल्या गोर गरीब व्यवसायिक यांना जागा देऊन रोज तसेच मासिक हप्ते राजकिय पुढारी व त्यांचे पंटर वसूल करत असतात. या अतिक्रमणाला राजकिय नेते जेवढे जबाबदार आहेत त्या पेक्षा जास्त नगर पालिका प्रशासन जबाबदार आहे. नगर पालिकेच्या वसूली विभागाच्या आशीर्वादाने जागा अधिग्रहित केल्या जातात त्यांना वीज कनेक्शन घेण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते. या अतिक्रमण करुन व्यवसाय करणारा कडून रोजच्या रोज एकच नाही तर दोन बाजार पावत्या वसूल केल्या जातात तसेच असे असेल तर या अधिकारी यांच्यावर देखील कारवाई का होत नाही हा विषय तेवढच महत्वाचा आहे .

 
मागील कालावधीत काढलेल्या अतिक्रमण जागेवर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असताना वसूल विभागातील कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.रस्त्यावर अतिक्रमण करणारा मूळे वाहतूक कोंडी होत असेल त्यांना अवरणे आवश्यक आहेच मात्र जे व्यावसायिक वर्षानुवर्षे त्या जागेवर छोटे व्यवसाय करतात त्यांना संरक्षण देण्याचे काम व्हावे. तसेच खऱ्या अर्थाने  गोदावरी नदीवरील छोटा पुल ते येवला नाका या बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक एवढ्या पुरता हा विषय मर्यादित नसून इतर भागात देखील हिच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. " 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!