जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता -- आ. आशुतोष काळे
नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात. पुढे राहण्याची हि परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता असल्याचे प्रतिपादन .आ.आशुतोष काळे यांनी करत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन केले .
विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) वतीने कोपरगाव मतदार संघात पक्षाची ताकद वाढवून पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
त्यासाठी कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होणे अत्यंत गरजेचे असून कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर देवून प्रत्येक कार्यकर्त्याने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राबणारा पक्ष हि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओळख व पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवावी. आपण पाच वर्षात जनतेला अपेक्षित असलेली केलेली जनहिताची कामे व यापुढील काळात मतदार संघात करणार असलेली कामे जनतेला सांगा. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानात स्वत:ला झोकून द्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. आशुतोष काळेंकडून कार्यकर्त्यांचे कौतुक----
" कोपरगाव मतदारसंघातील जनतेने ८० टक्के मतदान करून इतिहास रचला व संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यात कोपरगावचे नाव पाच नंबरला झळकले.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पदाधिकार्याने व कार्यकर्त्याने झटून शिस्तबद्ध काम केल्यामुळे मला ऐतिहासिक मताधिक्य मिळाले हे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे शक्य झाले आहे. कार्यकर्ते हीच खरी पक्षाची ताकद असून एवढे मताधिक्य मिळाल्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे."
- आ. आशुतोष काळे.




.jpg)




