banner ads

अतिक्रमीत बांधकाम काढण्याचा तयारीचे स्वागतच पन प्रशासनाने याचाही खुलासा करावा

kopargaonsamachar
0

 अतिक्रमीत बांधकाम काढण्याचा  तयारीचे स्वागतच पन प्रशासनाने याचाही  खुलासा करावा -- अॕड. रविकाका बोरावके


( नागरिक कोर्टात दाद मागणार )

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

सरकारी व नगर पालिकेच्या जागेवरील अतिक्रमीत बांधकाम काढण्याची तयारी प्रशासन करीत आहे प्रशासनाच्या या भूमिकेचे कोपरगाव वासींय स्वागतच करणार व करतील माञ  नगर पालिकेने पैसे कमविणेच्या हेतुने  'टाऊन प्लॅनिंग' चे नियम डावलून रस्त्यावर बांधकाम करुन गाळे बांधलेत त्याचे काय? याने रहदारीला वा पादचाऱ्यांना त्रास होत नाही काय ? असा खडा सवाल शहरवासींयांच्या वतीने अॕड.रविकाका बोरावके यांनी प्रशासनाला केला असुन या मुद्यावरून नागरीक कोर्टात दाद मागणार असल्याचेही अॕड.रविकाका बोरावके यांनी म्हटले आहे.


शहरातील मुख्य रस्ते,फूटपाथ,सार्वजनिक जागेवर केलेल्या अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होवूनयामुळे पायदळी चालणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होतो.शहराच्या मुख्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचा श्वास कोंडला असल्याचे चित्र नगरपालिका प्रशासनाला दिसते त्यामुळे कुठेतरी अतिक्रमण संपूष्टात येणे गरजेचे वाटल्याने मंगळवारी (दि. ४) रोजी कोपरगाव शहरात दिवसभर नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक रचनाकार , रचना सहाय्यक ,प्रभारी आरोग्य निरीक्षक , यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी फौज फाट्यासह कोपरगाव  शहरातील अतिक्रमित भागात दाखल झाले यावेळी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  मोजमाप करण्यात आले आहे.

त्या ठिकाणी लाल निशान करण्यात आले आहे. यामुळे'वाहतुक कोंडी होणार नाही व पादचाऱ्यांना त्रास होणार नाही.'असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर. नगर पालिकेने पैसे कमविणेच्या हेतुने  'टाऊन प्लॅनिंग' चे नियम डावलून रस्त्यावर बांधकाम करुन गाळे बांधलेत त्याचे काय? उदाहरण द्यायचेच झाले तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ बांगडी चाळ हटवून केलेले बांधकाम,  बस स्टॅन्डच्या पूर्वेला सेंट्रल गोडाऊन च्या जागेजवळ रस्त्यावर बांधलेले गाळे.गांधी नगर रोडला शाळेच्या मागील भिंती लगत व टिळक नगर च्या पूर्वेला शाळेच्या भिंती लगत स्त्यावर बांधलेले गाळे.

हे नगरपालिकेने पैसे मिळविनेच्या हेतुने केलेले अतिक्रमन नाही काय? याने रहदारीला वा पादचाऱ्यांना त्रास होत नाही काय ? याचा अगोदर खुलासा प्रशासनाने व नगरपालिकेने  करावा व मग बुलडोझर चालवावा.अशी सर्वसामान्य  नागरिकांची मागणी आहे.  तर  या मुद्यावरूनच नागरीक कोर्टात दाद मागणार असल्याचे ॲड. रविकाका बोरावके यांनी सांगितले .



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!